नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पतंप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी दुसरे नेते ठरले.
नरेंद्र मोदी विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत. मोदींनी भारतीय राजकारण आणि प्रशासनात परिवर्तन घडवून आणले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती पथावर असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
नरेंद्र मोदी थोड्याच वेळात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी दिल्लीत भाजपची ‘टीम गोवा’ सज्ज झाली आहे. यावेळी टीम गोवाने फोटोसेशन केले.
कोकण रेल्वे विभागाने 10 जूनपासून मॉन्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. प्रवाशांनी रेल्वेच्या वेळेतील बदलासाठी जवळच्या रेल्वे स्टेशनवर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
उसगाव-खांडेपार येथे आज (9 जून) MIBK हायस्कूलजवळ पावसाच्या तडाख्यामुळे झाडासह रस्ता उखडला.
कोलवा समुद्र किनाऱ्यावर गस्त घालत असताना पोलिसांना एक युवती बुडताना दिसली. त्यांनी तात्काळ जीवरक्षकांच्या मदतीने तिला बुडण्यापासून वाचवले. पीडितेचे नाव नॅन्सी वर्मा असून ती अवघ्या 24 वर्षांची आहे. नॅन्सी ही उत्तर प्रदेशची रहिवासी आहे.
बागा समुद्र किनाऱ्यावर गस्त घालत असताना पोलिस विक्रम गावस आणि साहिल पाल यांना एक पर्यटक समुद्रात बुडताना दिसला. त्यांनी तात्काळ जीवरक्षकांच्या मदतीने त्याला बुडण्यापासून वाचवले. सिद्धार्थ एस. कमडोली, असे पीडिताचे नाव असून तो अवघ्या 24 वर्षांचा आहे. सिद्धार्थ हा कर्नाटकातील हुबळी येथील रहिवासी आहे.
राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून काल आणि आज रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे. पहिल्या पावसातच वाळपई उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पाणी साचून तळे झाले. पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने 8 जून आणि 9 जून या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट वर्तवला आहे. राज्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. नागरिकांना सतर्कतेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या श्रीपाद नाईकांना दिल्लीतील निवासस्थानी मंत्री सुदीन ढवळीकर, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री अलेक्स सिक्वेरा आणि आमदार दिगंबर कामत यांनी शुभेच्छा दिल्या.
मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये श्रीपाद भाऊंच्या रुपाने गोव्याला प्रतिनिधित्व मिळत आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. याचा फायदा गोवा सरकार तसेच समस्त गोवेकरांना होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उत्तर गोव्यातून विक्रमी सहाव्यांदा विजयी ठरलेले श्रीपाद नाईकही आज शपथ घेणार आहेत. एनडीए सरकारमध्ये नाईकांना कॅबीनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.