Goa Beach : रासायनिक सांडपाण्यामुळे किनारी मृत माशांचा खच

Goa Beach : मी आज मच्छीमारांसह वेळसांव किनाऱ्याची पाहणी केली. तेथे समुद्री जीव आणि मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळले.
Goa Beach
Goa Beach Dainik Gomantak

Goa Beach :

वास्को, झुआरीनगर येथील मे. पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड (आधीची मेसर्स झुआरी ॲग्रो केमिकल्स लि.) कंपनीने अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रवपदार्थ असलेले सांडपाणी सोडल्यामुळे दांडो-वेळसांव किनाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

दांडो-वेळसांव किनाऱ्यावरील ''पोईम'' या नावाने प्रसिद्ध असलेल्या खाऱ्या पाण्याच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीकडून असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप येथील मच्छीमारांनी केला आहे.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी माशांच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी शनिवारी मच्छीमारांसह वेळसांव समुद्र किनाऱ्याला भेट दिली. तेथे पारादीप फॉस्फेट कंपनीकडून समुद्रात सांडपाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात सागरी जीव, विशेषत: मासे मृतावस्थेत आढळले. मच्छीमारांनी या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Goa Beach
Tigers In Goa Forest: गोव्याच्या जंगलात 'वाघ' वाढणार; सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार बळकट

मी आज मच्छीमारांसह वेळसांव किनाऱ्याची पाहणी केली. तेथे समुद्री जीव आणि मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळले. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. याविषयी मी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून पारादीप फॉस्फेट ली. कंपनीवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

- आंतोन वाझ, आमदार, कुठ्ठाळी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com