Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Kharif Sowing Area Decline 2026: एल निनोमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही केंद्र सरकारने आगामी रब्बीच्या हंगामात १७७.७२ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे.
Kharif Sowing Area Decline 2026
Kharif Sowing Area DeclineDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: एल निनोमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही केंद्र सरकारने आगामी रब्बीच्या हंगामात १७७.७२ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. एल निनोचे संकट आणि मॉन्सूनच्या सरासरी पर्जन्यमानात १२ टक्क्यांनी घट झाल्यामुळे यंदा खरीपाच्या हंगामात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये पेरणीचे क्षेत्र घटले आहे.

देशभरात धानाच्या क्षेत्रफळात सर्वाधिक १६.३२ लाख हेक्टरची घट झाली असून त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीन आणि मक्याचे क्षेत्रफळही घटले आहे. मात्र, देशभरातील पेरणीचे एकूण क्षेत्र केवळ एक टक्क्याने घटल्यामुळे यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात घट होणार नसल्याचे आज केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले.

Kharif Sowing Area Decline 2026
Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

एल निनोमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आगामी रबीच्या हंगामात १७७.७२ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती चौहान यांनी दोन दिवसांच्या राष्ट्रीय कृषी परिषदेअंती पत्रकारांशी बोलताना दिली. पेरणीखालील घटलेल्या क्षेत्रफळाविषयी कर्नाटक, महाराष्ट्र तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गुजरात राज्यांकडून विस्तृत अहवाल प्राप्त व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने खरीपाच्या हंगामासाठी १९६.२१ दशलक्ष टन धान्य उत्पादनासह २०२६-२७ मध्ये ३७३.९३ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. खरीपाच्या हंगामात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे देशभरातील सहा लाख ११ हेक्टर क्षेत्रफळ प्रभावित झाले. काही भागात जास्त तर काही भागात कमी होऊन एकूण उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. यंदा उडिद, बाजरी, ज्वारी. सूर्यमुखी आणि तुरीच्या क्षेत्रफळात वाढ झाल्याचे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. दरम्यान, या प्रतिकूल पार्श्वभूमीवर केंद्राने रबी हंगामासाठी १७७.७२ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे.

Kharif Sowing Area Decline 2026
Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

शेत वाचवा मोहीम

मातीचे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी या वर्षी २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान संपूर्ण देशात ‘शेत वाचवा मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.

महत्त्वाकांक्षी लक्ष्य

ज्या भागांमध्ये पाऊस कमी पडला किंवा पाण्याची टंचाई आहे तिथे भरपूर पाण्यापासून घेतल्या जाणाऱ्या पिकांपासून दूर राहाणे. डाळी आणि तेलबियांसारख्या पिकांवर भर देणे यासारख्या बाबी लक्षात ठेवून हे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पाण्याची उपलब्धता, मातीतील ओलावा, राज्यवार चर्चा आणि पीक पद्धती बदलून ते गाठण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी कमी पाण्यात आणि कमी वेळात येणाऱ्या पिकांसाठी राज्यांना सहकार्य करण्यात येईल. खरीप हंगाम संपल्यानंतर १६३ लाख टन खते रबी हंगामासाठी उपलब्ध असल्याचे चौहान यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com