Morjim Panchayat Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Morjim: पार्किंग प्रोजेक्टमुळे आमच्या घरावर बुलडोझर येईल, मोरजीत ग्रामस्थ संतप्त; प्रकल्पाला तीव्र विरोध

Morjim Panchayat Gramsabha: मोरजी ग्रामसभेत तेमवाडा समुद्रकिनारी भागात पर्यटन खात्यातर्फे आठ कोटी रुपये खर्च करून पार्किंग बहुउद्देशीय प्रकल्प उभारला जाणार आहे.

Sameer Panditrao

Morjim Parking Issue

मोरजी: मोरजी ग्रामसभेत तेमवाडा समुद्रकिनारी भागात पर्यटन खात्यातर्फे आठ कोटी रुपये खर्च करून पार्किंग बहुउद्देशीय प्रकल्प उभारला जाणार आहे. त्या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असून पार्किंग व्यवस्थेमुळे आणखी समस्या निर्माण होतील. पार्किंगपर्यंत जाण्यासाठी २५ मीटर रुंदीचा रस्ता जाणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरावर बुलडोझर येऊ शकतो, अशी भिती ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

पार्किंग प्रकल्प परिसरात बिगर गोमंतकीयांना जमिनी विकल्या आहेत. त्या जमिनीमध्ये मोठ प्रकल्प येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असून पंचायतीनेही त्याला विरोध करावा, अशी जोरदार मागणी जागृत नागरिक कॅप्टन जेराड डिसोझा, अल्बर्ट फर्नांडिस, मयूर शेटगावकर यांनी केली आणि तशा प्रकारचा ठराव मंजूरही करण्यात आला.

पार्किंग प्रकल्प कोणाला विश्वासात घेऊन उभारला जात आहे. तो कोणाच्या हितासाठी आहे, सीआरझेड, पर्यावरण विभागाकडून परवाने घेतले आहे का? एखादा दगड लावण्यासाठी सीआरझेड विभागाचा परवाना घ्यावा लागतो. याची माहिती पर्यटन खात्याला नाही का? किंवा पंचायत याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे का? असा सवाल कॅप्टन जेराड डिसोजा यांनी उपस्थित केला.

पार्किंग प्रकल्प सरकारने उभारला तर कायदेशीर तो बंद पाडू, असा इशारा मयूर शेटगावकर यांनी दिला. मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच पवन मोरजे यांच्या अध्यक्षतेखाली २३ रोजी पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

एकमेव लेखी अर्ज!

तुकाराम शेटगावकर यांचा एकमेव लेखी स्वरूपाचा अर्ज ग्रामसभेसमोर आला. तुकाराम शेटगावकर यांनी या ग्रामसभेत बेकायदेशीर जे कोणी बनावट पद्धतीने तक्रारी करतात. त्यांच्याकडून पंचायत आधार कार्ड, त्यांची फोटो कॉपी घेते की नाही किंवा अर्जदाराची बनावट सही बनावट क्रमांक घेऊन तक्रारी स्वीकारल्या जातात का? असा सवाल केला. त्यावेळी यापुढे जो कोणी बांधकामाविषयी किंवा इतर तक्रारी देत असेल तर आधार कार्ड पाहिले जाते, असे सरपंच मोरजे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्यात 54 लाख पर्यटक! सहा महिन्यात विक्रमी भरारी; पर्यटनाचा नवा उच्चांक नोंद

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातली भुताटकी

Forced Conversion: हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

Goa Accident: 2 वाहनांची समोरासमोर टक्कर, ताबा सुटून गाडी कोसळली; गोव्यात अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

Goa Politics: 'शत्रू चित्रपटातच नव्हे, विधानसभेतही झोपतात'! सरदेसाईंचा टोला; कुणाची ॲलर्जी नसल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT