Russian woman tourist assault Dainik Gomantak
गोवा

Russian Woman Assault: रशियन महिला पर्यटकाला खोलीत घुसून मारहाण, दात पडून गंभीर दुखापत; पुराव्याअभावी संशयितांची सुटका

Morjim hotel assault case: न्यायाधीश शबनम नागवेकर यांनी निकालात नमूद केले की, घडलेल्या प्रकाराची सत्यता स्पष्ट करण्यासाठी तक्रारदार हीच सर्वात महत्त्वाची साक्षीदार होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मोरजी येथील एका हॉटेलमध्ये घुसून रशियन महिला पर्यटकाला मारहाण केल्याच्या आरोपातून पेडणे येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी दोघांची निर्दोष मुक्तता केली. पुराव्यांचा अभाव आणि मुख्य साक्षीदारांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने हा निकाल दिला.

२४ मार्च २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास मोरजी येथील ''हॉटेल ग्रँड इन'' मध्ये ही घटना घडली होती. आरोपी अबिनाश गोरिया (२९, आसाम) आणि मोहम्मद खान (२६, झारखंड) यांनी रशियन पर्यटकाच्या खोलीत शिरून तिला मारहाण केल्याचा आरोप होता. या हल्ल्यात पीडितेचा दात पडला होता आणि ओठाला गंभीर दुखापत झाली होती.

पोलिसांनी संशयितांविरुद्ध आयपीसी कलम ३२५ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुमेधा महाले यांनी पंचनामा आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली. मात्र, ज्या रशियन महिलेने तक्रार केली होती, ती साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहू शकली नाही.

तक्रारदाराला या घटनेशी संशयितांचा थेट संबंध जोडणारे इतर ठोस पुरावेही सादर करता आले नाहीत .न्यायाधीश शबनम नागवेकर यांनी निकालात नमूद केले की, घडलेल्या प्रकाराची सत्यता स्पष्ट करण्यासाठी तक्रारदार हीच सर्वात महत्त्वाची साक्षीदार होती.

तिची साक्ष नसल्याने सरकारी पक्षाची बाजू पूर्णपणे कमकुवत ठरली आहे. केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८(१) अन्वये दोन्ही आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT