Morjim  Dainik Gomantak
गोवा

Morjim News : चोपडेतील आंबेडकर पुतळा हटवला ; आंबेडकरप्रेमींत नाराजी

Morjim News : जयंतीच्या पूर्वसंध्येला उभारला होता अर्धपुतळा

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News :

मोरजी, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पार्से आणि चोपडेतील आंबेडकरप्रेमींनी चोपडे सर्कलवर आंबेडकर यांचा अर्धपुतळा उभारला. पण आचारसंहितेचे कारण पुढे करून निवडणूक यंत्रणेने आज दुपारी तो हटवला.

सकाळी या ठिकाणी महामावन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लोकांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी वंदन करून एक चांगला पुतळा या ठिकाणी उभारल्याची भावना व्यक्त केली.

चोपडे पूल ते चोपडे सर्कल व्हाया खिंड मोरजीपर्यंत गोवा पर्यटन खात्याने कोट्यवधी रुपये खर्चून या रस्त्याचे सुशोभीकरण केले होते.या जंक्शनवर कारंजे होते.आंबेडकर पुतळा उभारल्याने हा परिसर पुन्हा प्रकाश झोतात आला आहे. आज हा पुतळा हटवल्याने आंबेडकरप्रेमी नाराज झाला आहे.

निवडणूक आचारसंहिता भंगाची सबब

आचासंहिता भंग केल्याप्रकरणी चोपडे सर्कलकडे. बसवण्यात आलेला दुपारी हटवण्यात आला.निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुतळा हटवण्यात महत्वाची भूमिका बजावली.

हा पुतळा जयंतीच्या पूर्वसंध्येला पार्से व चोपडेतील आंबेडकर प्रेमींकडून बसवण्यात आला होता. या पुतळ्यासाठी संबंधितांनी परवानगी घेतली नव्हती,असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: 3 दिवसांपासून होता बेपत्ता, कुशावती नदीत आढळला सडलेला मृतदेह; 16 वर्षाच्या तरुणाच्या मृत्यूमुळे खळबळ

Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! कोकणी-मराठीसह परदेशी भाषांना वाव; सरकारच्या निर्णयामुळे संभ्रम दूर

Ponda By Election: दळवींच्या कार्यकर्त्यांपुढे प्रश्नचिन्ह! अन्‍याय झाल्‍याची भावना; रितेश नाईकांपुढे मोठे आव्हान

Borim Temple Theft: फोंड्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच! बोरी गोपाळकृष्ण मंदिराची फंडपेटी दुसऱ्यांदा फोडली; पोलिसांसमोर आव्हान

Goa Politics: खरी कुजबुज; सारेच ‘गॅस’वर

SCROLL FOR NEXT