Goa Vidyaprasarak Mandal RPRHS Ponda Student Protest
फोंडा: शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली थांबवावी म्हणून गुरुवारी (दि. ५ डिसेंबर) रोजी राजमाता पद्मावती राजे सौंदेकर (RPRHS) माध्यमिक शाळेच्या मुलांनी तसेच पालक शिक्षक संघाने शाळेच्या व्यवस्थापन समिती विरोधात आंदोलन सुरु केले. फोंड्यात गोवा विद्याप्रसारक मंडळ म्हणजेच GVM's या शैक्षणिक संघटनेच्या अंतर्गत काही शाळांचा समावेश होतो आणि त्यापैकीच एक म्हणजे RPRHS.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सात वर्षांत या विद्यालयातून सात मुख्याद्यापकांची बदली झाली आहे आणि अशा वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांवर तसेच शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम दिसून येतोय. आता देखील दत्तात्रेय सर यांची बदली मागे घ्यावी अशी मागणी करत २०० पेक्षा अधिक विद्यार्थी आंदोलनात सामील झाले होते आणि एवढ्या मोठ्या जमावापुढे व्यवस्थापनाने हार मनात बदलीचा निर्णय मागे घेतला आहे.
आंदोलनामध्ये सामील असलेल्या पालक दीपाली नाईक यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रेय सरांची मुख्याध्यापक म्हणून तीन महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्या येण्याने शाळेच्या व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल घडून येत होते, मात्र तरीही कारण न स्पष्ट करता शाळेच्या व्यवस्थापन समितीने दत्तात्रेय सरांची बदली करण्याच्या निर्णय जारी केला.
दीपाली नाईक असेही म्हणाल्या की RPRHS माध्यमिक विद्यालयाचा शिक्षकवर्ग उत्तम आहे आणि इथे मुलांवर उत्तम संस्कार केले जातात मात्र मुख्याध्यापकांची होणारी बदली ही शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्ट्टीने योग्य नाही.
पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दत्तात्रेय सरांची बदली थांबवावी म्हणून व्यवस्थापन समितीला पुरेसा वेळ दिला होता आणि बदली न थांबल्यास आंदोलन करण्याचे संकेत दिले होते मात्र तरीही व्यवस्थापन समितीने निर्णय मागे न घेतल्याने पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दत्तात्रेय सरांनी केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक बदल घडवून आणले आहेत.
१०वी चे विद्यार्थी सध्या अंतिम परीक्षेची तयारी करतायत आणि अशावेळी मुख्याध्यापकांची अचानक होणारी बदली विद्यार्थ्यांना आणि पालकांना पटणारी नव्हती. दत्तात्रेय सर आता पुन्हा मुख्याध्यापक पदावर नियुक्त झाल्याने RPRHSमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.