GMC Goa Dainik Gomantak
गोवा

GMC कोरोनाच्या विळख्यात; 200 हून अधिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी बाधित

GMC मधील तीन विभाग प्रमुखांना कोविडची लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) 200 हून अधिक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी राज्याच्या प्रमुख आरोग्य सेवा संस्थेच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. कोरोनाबाधितांमद्धे 100 हून अधिक डॉक्टरांचा समावेश आहे. रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या केवळ 2-3 दिवसांत दुप्पट झाली आहे. (GMC Goa COVID-19 Latest Update)

प्रत्येक संक्रमित व्यक्तीला किमान सात दिवस होम आयसोलेशनमध्ये असणे आवश्यक आहे. सध्या GMC मधील अनेक आरोग्य कर्मचारी (Health Workers) कोरोनाबाधित आहेत. रूग्णालयाने आपल्या नित्य सेवा कमी केल्या असल्या तरीही, सामान्य माणूस आजारी पडल्यावर GMC कडेच धाव घेतो. ही बाब लक्षात घेत रुग्णालयाने (Hospital) आपत्ती व्यवस्थापन योजना आखणे आवश्यक आहे, असे रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले.

GMC मधील तीन विभाग प्रमुखांना कोविडची लागण झाली आहे आणि ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या, बहुसंख्य कोविड रूग्णांवर GMC च्या सुपर-स्पेशालिटी ब्लॉकमध्ये उपचार केले जातात.

ओमिक्रॉनची संसर्गक्षमता खूप जास्त असल्याने, पुढील काही दिवसांत आणखी GMC कर्मचार्‍यांची चाचणी सकारात्मक आली तर आश्चर्य वाटायला नको. राज्यात ख्रिसमसच्या आधी 31 हॉट स्पॉट होते. पुढे 4 जानेवारीपर्यंत हॉट स्पॉटची संख्या 73 झाली. येत्या काही दिवसांत ही संख्या 171 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे GMC मधील डॉक्टर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT