Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023 : राज्यात चित्रशाळांऐवजी विक्रीकेंद्रेच अधिक

Goa Ganesh Chaturthi 2023 : म्‍हापशात गजबज गणेेशमूर्ती बनविण्‍यात नाटेकर घराण्‍याचा दबदबा

दैनिक गोमन्तक

प्रकाश धुमाळ

Goa Ganesh Chaturthi 2023 : म्‍हापसा शहरात गणेशमूर्तीच्या चित्रशाळा गजबजल्‍या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी विक्रीकेंद्रांच्या माध्‍यमातून ही दुकाने कार्यरत आहेत. म्हापशात गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. येथे मूर्तिकारांची परंपरा बहुतांशी नाटेकर घराण्याशी निगडित आहे.

राज्‍यातील इतर शहरांमधील एकंदर विक्री पाहिल्यास गणेशमूर्तींची सर्वाधिक विक्री म्हापशातच होते. म्हापसा शहरात बार्देश तालुक्याप्रमाणेच प्रामुख्याने मये, पासें, मांद्रे आदी गावांतील तसेच गोव्याबाहेरीलही गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध होत असतात. येथील युवा गणेशमूर्तीकार जयंत नाटेकर हे सध्या म्हापसा हनुमान नाट्यगृहात चिकणमातीपासून बनविलेल्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत.

म्हापशातील मूर्तिकारांची परंपरा बहुतांशी नाटेकर घराण्याशी निगडित आहे. चणेकर, पोकळे, दिवकर घराण्यांनीही त्यात मोठे योगदान दिलेले आहे. जुन्या काळात कै. सोनू नाटेकर, कै. वसंत नाटेकर आणि कै. भालचंद्र नाटेकर अशा मूर्तिकारांचा लौकिक संपूर्ण गोव्‍यात होता.

भालचंद्र नाटेकर यांचा वारसा त्यांचे सुपूत्र कै. यशवंत नाटेकर व जयपाल नाटेकर यांनी चालवला व सध्या तो वारसा त्यांचेच नातू जयंत नाटेकर पुढे चालवत आहेत. आता त्‍यांची तिसरी पिढी मूर्ती घडविण्याचे कार्य करीत आहे.

विपुल नाटेकर यांचेही सहकार्य लाभत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरेख-सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती तयार केल्‍या जात आहेत.

श्री गणेशाच्या मूर्तींबरोबरच महादेव-पार्वती, सरस्वती, श्रीकृष्ण आणि लक्ष्मीच्या मूर्तीही जयंत नाटेकर सिद्धहस्त कलेद्वारे घडवतात. यशोदा-कृष्णाच्या मूर्तीही ते तयार करतात.

नाटेकर यांच्याकडे नाट्यालंकार भांडारही उपलब्ध असून, उत्तर गोव्यात या क्षेत्रात त्यांच्याच नावाचा बोलबाला आहे. नाट्यप्रयोगांसाठी रंगभूषा आणि वेशभूषा करण्यात त्यांचा हातखंडा असून दिवाळीच्या दिवसांत नरकासुराचे मुखवटेही ते बनवितात.

पूर्वी कै. महाबळेश्वर दिवकर व दिलीप पोकळे थोड्याफार प्रमाणात गणपतीच्या मूर्ती तयार करत असत. सध्या दिलीप पोकळे मोठ्या प्रमाणात नसले तरी दत्तवाडी भागातील काही ठरावीक कुटुंबांना गणपतीच्या मूर्ती बनवून देतात.

परराज्यांतील गणेशमूर्तींची आवक वाढली

अलीकडच्‍या काही वर्षांत पररज्‍यांतून येणाऱ्या गणेशमूर्तींची आवक वाढली आहे. त्‍यामुळे मूळचा इथला मूर्तिकार बाजूला पडत चाललाय. मागची कितीतरी वर्षे म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती कै. सोनू नाटेकर तर खोर्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती कै. वसंत नाटेकर तयार करायचे. आता महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून येणाऱ्या मू्तींची आवक वाढली आहे. परिणामी अनेक ठिकाणी परराज्यांतून आयात केलेल्या गणपतींच्या चित्रशाळा दिसून येतात.

हनुमान नाट्यगृहात शेकडो गणेशमूर्ती

अलीकडच्‍या काळात सीम-खोर्ली येथे ‘साई गणेश आर्टस्‌’ ही चित्रशाळा दरवर्षी बऱ्यापैकी गणेशमूर्ती उपलब्ध करीत असते. तसेच खोर्ली येथेही जयंत नाटेकर यांच्या चित्रशाळेच्या परिसरात काही चित्रशाळा कार्यरत आहेत. म्हापसा येथे केंद्रवर्ती ठिकाणी हनुमान नाट्यगृहात नाटेकरांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. तिथे शेकडो गणेशमूर्ती दाटीवाटीने अगदी नाट्यगृहाच्या पायऱ्यांपर्यंतसुद्धा ठेवल्याचे दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT