IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

Virat Kohli-Rohit Sharma: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे (ODI) मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
Rohit Sharma, Virat Kohli
Rohit Sharma, Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli-Rohit Sharma: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे (ODI) मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ सध्या रांचीमध्ये दाखल झाले असून जोरदार सराव करत आहेत. या मालिकेमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाचे (Team India) दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या पहिल्या वनडे सामन्यात मैदानात उतरताच रोहित-कोहलीची ही जोडी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित करेल.

रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत धमाकेदार कामगिरी केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीची जोडी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही कमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. रांची येथे होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळताना दिसतील. या सामन्यात मैदानात उतरताच, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकत्रितपणे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे भारतीय खेळाडू बनतील.

रोहित-कोहलीची जोडी या कामगिरीने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मोडेल. सचिन आणि द्रविड यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकत्रितपणे 391 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. रोहित आणि कोहलीनेही आतापर्यंत 391 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत. रांची वनडे हा त्यांचा 392वा आंतरराष्ट्रीय सामना असेल.

Rohit Sharma, Virat Kohli
IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

जगातील विक्रम

जगात एकत्र सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल 550 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत.

Rohit Sharma, Virat Kohli
IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळलेले खेळाडू (भारतीय जोडी)

रोहित-कोहली – 391

सचिन-द्रविड – 391

द्रविड-गांगुली – 369

सचिन-कुंबळे – 367

सचिन-गांगुली – 341

कोहली-जडेजा – 309

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर, रांची

दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर, रायपूर

तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर, विशाखापट्टणम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com