IFFI Goa 2025: इफ्फीच्या रेड कार्पेटवर धनुष-क्रिती सेनॉनचा जलवा; 'तेरे इश्क में'च्या गाला प्रीमिअरला लावली हजेरी! Watch Video

Dhanush Kriti Sanon Red Carpet Look IFFI: अभिनेता धनुष आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांनीही 'तेरे इश्क में' या चित्रपटाच्या 'गाला प्रीमिअर'ला खास हजेरी लावली.
Dhanush Kriti Sanon
Dhanush Kriti SanonDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर सिनेजगतातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यात विशेषतः अभिनेता धनुष आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांनीही 'तेरे इश्क में' या चित्रपटाच्या 'गाला प्रीमिअर'ला खास हजेरी लावली.

धनुष आणि क्रितीची स्टाईल

अभिनेता धनुष वेस्टर्न स्टाईलमध्ये दिसला. यावेळी त्याने ग्रे कलरचा सूट परिधान केला होता, जो त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा होता. धनुषची शांत आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थिती रेड कार्पेटवर लक्षवेधी ठरली. तसेच, अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. इफ्फीच्या रेड कार्पेटवरही तिने डिझायनर साडीमध्ये आपली मोहक स्टाईल दाखवली. तिच्या एलीगंट लूकने उपस्थितांचे लक्ष वेधले.

Dhanush Kriti Sanon
IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

'तेरे इश्क में' चा प्रीमिअर

या गाला प्रीमिअरमध्ये धनुष आणि क्रिती सेनॉनसह या चित्रपटाशी संबंधित इतर कलाकारही उपस्थित होते. 56व्या इफ्फीमध्ये या चित्रपटाचे प्रीमिअर होणे, ही एक मोठी गोष्ट मानली जात आहे. या दोघांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधला आणि चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. 'तेरे इश्क में' या चित्रपटाच्या निमित्ताने ही दोन्ही कलाकार एकत्र दिसले, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा क्षण खास ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com