Panjim Ashtami Ferry: पणजीत अष्‍टमीच्‍या फेरीतील बेकायदा साहित्‍य जप्‍त

Panjim Ashtami Ferry: मनपाची कारवाई : भाडेपट्टी न भरताच दहा व्यावसायिकांचा सुरू होता खुलेआम व्यवसाय
Panjim Ashtami Ferry
Panjim Ashtami FerryDainik Gomantak

Panjim Ashtami Ferry: अष्टमीच्या फेरीसाठी राजधानी पणजीतील मांडवी किनारी सुमारे 400 दुकानांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अनेकांनी अर्ज नेले, पण भाडेपट्टीची रक्कम न भरता दुकाने थाटणाऱ्या दहा व्यावसायिकांचे साहित्य महानगरपालिकेने आज मंगळवारी जप्त केले.

Panjim Ashtami Ferry
54 IFFI 2023: 54 व्या इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू

महापौर रोहित मोन्सेरात व आयुक्त क्लेन मेदेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्‍या निरीक्षकांनी ही कारवाई केली. आज सायंकाळी महागनरपालिकेच्या निरीक्षकांच्या पथकाने व्यावयायिकांकडे भाडेपट्टी भरलेल्या पावत्यांची तपासणी केली.

त्यात जीवनावश्‍यक वस्तू, लाकडी साहित्‍य व कपडे अशी विक्री करणाऱ्या दहा दुकानांच्या मालकांकडे पैसे भरलेल्या पावत्‍या सापडल्या नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेने या दुकानांतील सर्व साहित्य जप्त केले.

गणेश चतुर्थीला लागणाऱ्या वस्तू अष्टमीच्या फेरीत विकल्या जातात. त्यात विवाह झालेल्या मुलींच्या घरी तिच्या आईवडिलांकडून ‘ओझे’ देण्याची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे नववधू मुलींचे पालक या फेरीतील तयार वस्तू खरेदी करतात.

मनपाला आत्तापर्यंत 60 लाखांचा महसूल

अष्टमीच्या फेरीत परराज्यातील व्यावसायिकांनी अधिकतर कपडे व इतर वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. यावर्षी महानगरपालिकेने दुकानांसाठी एकरकमी रक्कम स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

Panjim Ashtami Ferry
Accident Death : सिडनीचा मृतदेह भावाकडे सुपूर्द, नातेवाईकांचा प्रशासनावर रोष

त्यामुळे मनपाला आत्तापर्यंत ६० लाखांपर्यंत महसूल मिळाला असल्याची माहिती प्राप्‍त झाली आहे. परंतु ज्यांनी अर्ज नेले, त्यातील काहीजण दुकान थाटण्यासाठी आलेले नाहीत. त्याचाच फायदा घेऊन मोकळ्या जागेत काहींनी दुकाने थाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेने आज त्यांच्यावर कारवाई करीत साहित्य जप्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com