

PM Modi To Unveil Asia's Tallest 77-Foot Lord Ram Statue In Goa
पणजी: गोव्यातील काणकोण तालुक्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या परिसरात शुक्रवारी ( २८ नोव्हेंबर) एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळा पार पडला. मठाच्या ५५० वर्षांच्या पूर्ती निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या ७७ फुट उंचीच्या मर्यादा पुरूषोत्तम श्री रामांच्या मूर्तीचे अनावर करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल अशोक गजपती राजू, बांधकाम मंत्री दिगंबर कामत, उद्योगपती शिवानंद साळगावकर, अनिल पै यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
सर्वात उंच श्रीरामांच्या मूर्तीमुळे कणकोण आणि परिसराचा धार्मिक पर्यटन म्हणून मोठ्या प्रमाणात विकास होणार असून, देश-विदेशातील भक्त आणि पर्यटक येथे आकर्षित होतील.
श्रीराम मूर्तीचे हे अनावरण केवळ एका धार्मिक सोहळ्यापुरते मर्यादित नसून, गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा क्षण ठरला आहे.
गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचं डिझाईन करणारे शिल्पकार राम सुतार यांनीच गोव्यातील श्रीरामांच्या मूर्ती घडवली आहे. ही आशियातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.