Mopa Link Roads hearing Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोड: आज महत्त्‍वपूर्ण सुनावणी

25 मार्चला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोपा लिंक रोडसाठी सरकारकडून कंत्राटदाराला रान मोकळे झाले आहे. तो खोदकाम तसेच झाडांची कत्तल करत सुटला आहे. दुसरीकडे शेतकरी आम्हाला कोणी न्याय देतो का न्याय, या आशेने वेगवेगळ्या विविध माध्यमांतून जनजागृती चळवळ, आंदोलने तसेच न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. परंतु तेथेही ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. आता आज शुक्रवार दि. 25 मार्चला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोपा लिंक रोड कामाबाबत एका बाजूने न्यायालयात सुनावणी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने काम खुलेआम सुरू आहे. राष्‍ट्रीय महामार्ग ते मोपा विमानतळ या साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सरकारने गतसाली जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावा करत काही पीडित शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूने वारखंडचे सरपंच संजय तुळसकर यांच्या नेतृत्वाखालील पंचायत मंडळाने मोपा लिंक रोड करणाऱ्या कंत्राटदाराला लेखी नोटीस पाठवून काम बंद करण्याचा आदेश दिला होता. परंतु कंत्राटदाराने पंचायतीच्या आदेशाला पंचायत संचालनालयाकडे आव्हान देत स्थगिती मिळवली. या प्रकरणी 15 मार्च रोजी सुनावणी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

SCROLL FOR NEXT