Manohar International Airport Goa Dainik Gomantak
गोवा

भाऊ, भाई आणि जॅक सिक्वेरा वादात 'मनोहर' नाव फायनल! तरीही पर्रीकरांचं नाव दिल्याने का होतोय वाद?

मोपा येथील विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव दिल्याने गोव्यात वाद होत आहे.

Pramod Yadav

गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा विमानतळाचे रविवार, 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मोपा विमानतळ गोव्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी आणि पर्यटनाला चालना देण्याचे काम करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. याचवेळी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नामकरणाच्या वादावर देखील पडदा पडला. मोपा विमानतळाला सरकारने दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचं नाव दिलं आहे. नरेंद्र मोदी यांनी "मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे विमानतळाच्या नावाची औपचारिक घोषणा यावेळी केली.

(What is Mopa International Airport, Goa Naming Contoversy)

मोपाच्या उद्घाटन संमारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मागील आठ वर्षात मला गोव्याने दिलेले प्रेम आणि आपुलकी याची मी प्रगतीच्या रूपाने व्याजासह परतफेड करेन. अत्याधुनिक मोपा विमानतळ हा त्याच प्रेमाचा एक भाग आहे. मोपा विमानतळाला दिलेले मनोहरभाई पर्रीकर यांचे नाव ही त्यांना दिलेली श्रद्धांजली आहे. मोपा गोव्याच्या विकासात महत्वाचा घटक ठरेल."

मोपा आणि नावाचे तीन वाद

मोपा येथील विमानतळाचे उद्घाटन जवळ आल्यानंतर गोव्यात विमानतळाला काय नाव द्यायचे यावरून वाद होऊ लागला. या विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब दयानंद बांदोडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने केली. याबाबत ठराव देखील एमजीपीचे विद्यमान अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मांडला होता. 'भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती' अंतर्गत विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली.

विरोधी पक्षनेते आणि ‘युनायटेड गोअन्स’पक्षाचे दिवंगत नेते जॅक सिक्वेरा यांच्या नावाची देखील विमानतळाच्या नावासाठी चर्चा होऊ लागली. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरणाला समर्थन देणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाला जॅक सिक्वेरा आणि त्यांच्या युनायटेड गोअन्स पक्षाने कडवा विरोध केला.

त्यानंतर मागणी होऊ लागली ती गोव्याचे चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेले मनोहर पर्रीकर यांच्या नावाची. गोव्यातील सत्ताधारी भाजप यासाठी आग्रही होता. त्याबाबत ठराव करून त्यांनी राज्य सरकार आणि त्यानंतर राज्य सरकाने हाच प्रस्ताव पुढे केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवला.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रीकर यांच्या नावाने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी औपचारिक घोषणा केली.

मनोहर पर्रीकरांच्या नावावरून वाद

मोपा येथील विमानतळाला मनोहर पर्रीकरांचे नाव देण्यात आले त्याचवेळी गोव्यातील विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे. या विमानतळाचं उद्घाटन सुरू असताना राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी प्रामुख्याने केली जात आहे.

गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी देखील भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव विमानतळाला देण्यात यावे अशी भर सभेत मागणी केली होती. या सभेला अॅड. अविनाश भोसले, डॉ. वासुदेव देशप्रभू, गजाननम मांद्रेकर, संजय बर्डे, विजय भिके, ख्रिस्तोफर फोन्सेका आदी नेते उपस्थित होते. बांदोडकरांनी गोव्याची सांस्कृतिक जपली पण, 2012 पासून भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने गोव्याची संस्कृतीच नष्ट केली. असा आरोप वेलिंगकर यांनी केला होता. तर, गोव्यात ‘मनोहर पर्रीकर लॉ स्कूल’आहे, दिल्लीत संरक्षण संशोधन संस्था आहे. काणकोण महामार्गालाही त्यांच नाव देण्यात आलंय. त्यामुळे मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी यावेळी केली.

मनोहर पर्रीकर असे नाव दुरूस्त करा

मोपा येथील विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, हे नाव दुरूस्त करून 'मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे देण्यात यावे अशी मागणी देखील भाजप प्रवक्ते साविओ रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT