Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : मोपावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणास काँग्रेसचा विरोध

राज्यातील भाजप सरकारच्या दबावाखाली एअरलाईन्स बळी पडल्याचा कॉंग्रेसचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोपा येथे हलविल्याच्या विरोधात गोवा काँग्रेसने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर निदर्शने केली. दाबोळी विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा व कार्गो सेवा हळूहळू मोपा विमानतळावर हलविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ गोवा युवक काँग्रेसतर्फे निषेध फेरी काढण्यात आली.

याप्रसंगी गोम्स यांनी माहिती देताना भाजपा सरकारच्या धोरणाचा निषेध केला. याप्रसंगी प्रदीप नाईक, दक्षिण गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नदार उपस्थित होते.

गोवा प्रदेश युवक काँग्रेसने एअर इंडियाच्या विरोधात आंदोलन करत, एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय उड्डाणे दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर हलविण्यास विरोध केला.

21 जुलै 2023 पासून गोवा ते गॅटविक विमान, लंडन ते मोपा विमानतळावर उड्डाण करणारे आंतरराष्ट्रीय विमान स्थलांतरित करण्यासाठी केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकारच्या दबावाखाली एअरलाईन्स बळी पडल्याचा कॉंग्रेसने आरोप केला.

सरकारी यंत्रणा विकण्याचे षडयंत्र भाजप सरकारने चालवले आहे, हळूहळू गेट विक, ओमान, कतार आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोपावर कार्यान्वीत होणार. त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांना त्रास सोसावा लागेल, असे गोम्स

म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT