Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : मुहूर्त पुन्हा लांबणीवर; ‘मोपा’वरून जानेवारीत उड्डाण

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. जानेवारी 2023 पासून येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. नागरी विमान सेवा मात्र दाबोळी येथेच राहाणार असून ते बंद होणार नाही, असे मोपा विमानतळ संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी आज स्पष्ट केले. ‘दाबोळी बंद’वरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच शानभोग यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

ते म्हणाले, दाबोळी विमानतळ हे मुळात नौदलाचे आहे. नौदलासाठी नेहमी काही तास नागरी उड्डाण बंद ठेवावे लागते. आंतरराष्ट्रीय मोठी जम्बो विमाने छोट्या दाबोळी विमानतळावर उतरू शकत नाहीत. त्यामुळे मोपासारख्या विमानतळाची आवश्‍यकता भासली. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय होईल व तूर्त दाबोळीला नागरी सेवा सुरूच राहिल. दाबोळी विमानतळावर सर्व साधनसुविधा आहेत. त्या वाया जाता कामा नये. खासगी विमानांसाठी पार्किंग व्यवस्था मोपा येथेच उत्तम आहे. दाबोळीपेक्षा मोपाला विमान पार्किंग भाडेही कमी असणार आहे. त्यामुळे खासगी विमाने मोपाकडे वळतील, असे शानभोग यांनी सांगितले.

उद्‍घाटन घोषणांत वारंवार बदल

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्‍घाटनाच्या तारखा पंतप्रधानांच्या अनुपलब्धतेमुळे वारंवार बदलत गेल्या. 14 जुलैला मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 2022 नंतर उद्‍घाटन होईल, असे घोषित केले होते. काम आटोक्यात नसल्याने 1 ऑगस्टला हे उद्‍घाटन सप्टेंबरनंतर होईल, असे सांगितले. त्यानंतर गोव्यात मोपा विमानतळावर पहिले विमान डिसेंबरमध्ये उतरेल असे सांगितले होते. मात्र, येत्या 8 डिसेंबरला पंतप्रधान एका कार्यक्रमानिमित्त गोव्यात येणार असल्याने त्याच दिवशी विमानतळाचेही उद्‍घाटन करण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेम्बर्ग, दुबई, सिंगापूर येथून येणारी कार्गो विमाने बंगळूर, हैद्राबाद येथील विमानतळावर उतरतात. ती आता मोपाला उतरतील. आयात-निर्यातीला गोव्याला चांगले दिवस येणार आहेत. भविष्यात रेल्वेमार्गही मोपाला जोडला जाऊ शकतो, अशी माहिती मोपा विमानतळाचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT