Goa Taxi Driver Assaulted  Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Counter : दहा दिवसांत टॅक्सी काऊंटर सुरू करा; अन्यथा प्रखर आंदोलन

मोपा एअरपोर्ट टॅक्सी संघटनेचा इशारा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mopa Taxi Counter at Manohar International Airport: मोपा विमानतळावर सरकारने दहा दिवसांत स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी टॅक्सी काऊंटर सुरू करावा, अन्यथा गाड्या मोपा रस्त्यावर आणून आम्ही प्रखर आंदोलन छेडू व त्याची सगळी जबाबदारी ही सरकारवर असेल, असा इशारा ग्रीन फिल्ड मोपा एअरपोर्ट टॅक्सी असोसिएशनचे नेते भास्कर नारूलकर, ॲड जितेंद्र गावकर, ॲड प्रसाद शहापूरकर व संघटनेचे अध्यक्ष उदय महाले यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

तत्पूर्वी संघटनेतर्फे पेडणे वाहतूक कार्यालयाचे सहाय्यक संचालक राजेश नाईक यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

भास्कर नारूलकर म्हणाले की,सरकारने टॅक्सी काऊंटर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आतापर्यंत पेडणे तालुक्यातील अनेक युवकांनी मोपा विमानतळावर टॅक्सी व्यवसायासाठी कुणी आपली आई ,पत्नीचे दागिने गहाण ठेवून गाड्या आणल्या आहेत. त्यांना आता बॅंकेचे व्याज सुरू होणार आहे.

मात्र, अद्याप टॅक्सी काऊंटर सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने युवकांना झुलवत ठेवले आहे. विमानतळासाठी कवडीमोल दराने जमीन घेतली.नोकऱ्यांबाबत फसवणूक केली. आमच्या ह्या युवकांना सरकारने निदान टॅक्सी व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना त्रासात टाकू नये.

ॲड प्रसाद शहापूरकर म्हणाले की ,विमानतळ पूर्ण होण्या अगोदर काही वर्षे टॅक्सी काऊंटर संबंधीचे नियोजन होणे आवश्यक होते.

"टॅक्सी काऊंटरसाठी जेव्हा आम्ही आंदोलन सुरु केले तेव्हा आमदार आर्लेकर यांनी हा प्रश्न आपण सोडवू,असे आश्वासन दिले होते. पण त्यात त्यांना यश आलेले नाही. मोपा विमानतळ हा एक महा घोटाळा आहे. आमदार आर्लेकर आपल्या एका नातेवाईकाला टॅक्सी काऊंटर देण्याच्या प्रयत्नात आहेत. पेडणेकरांना तुम्ही गृहित धरू नका."

- ॲड जितेंद्र गावकर, ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशन.

"मोपा विमानतळासाठी भाजप सरकारने आमच्या जमिनी लाटून,उपजीविकेची साधने नष्ट करून आम्हाला फसवले. आता उरलीसुरली आशा असलेला टॅक्सी व्यवसायही आम्हाला मिळू देत नाही.हे आम्ही खपवून घेणार नाही."

- उदय महाले, अध्यक्ष ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

Goa Rain Update: गोव्यात मुसळधार! राज्यात चार दिवस यलो अलर्ट; महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले

Prime Minister Dance: दमादम मस्त कलंदर... शिबानी कश्यपच्या गाण्यावर पंतप्रधानांचा भन्नाट डान्स, रंगली अविस्मरणीय मैफल Watch Video

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

SCROLL FOR NEXT