Goa Budget Session : मंत्री, आमदारांनी घेतला भरडधान्याचा आस्वाद

भरडधान्य वर्ष : पोषक धान्यांचे महत्त्‍व समजावे यासाठी जनजागृती मोहीम आणि उपक्रम
Goa Budget Session
Goa Budget SessionDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भरडधान्य वर्षानिमित्ताने या भरडधान्यांना प्रोत्साहन मिळावे आणि जनजागृती व्हावी यासाठी विधानसभेत भरडधान्यांच्‍या ‘किट्‌स’चे मंत्री आणि आमदारांना वाटप करण्‍यात आले.

दुपारच्या जेवणाचा बेतही भरडधान्याचाच होता, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर दिली.

Goa Budget Session
Rajgira Diet Benefits: केवळ उपवासाच्या वेळीच नाही तर रोजच्या आहारातही करा राजगिऱ्याचे सेवन

एप्रिल 2018 मध्ये भरडधान्यांना ‘पोषकधान्य’ हे नवीन नाव देण्यात आले. त्यानंतर वर्ष 2023 राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. पोषक धान्यांचे महत्त्‍व सर्वांपर्यंत पोहाचावे, यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

विधानसभेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मंत्री आमदारांना पोषक धान्यांच्या किट्स वाटण्यात आल्या. याबाबतची सविस्तर माहिती सभापतीनी सभागृहात दिली. राज्यात भरडधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून या पोषक धान्याची माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचावी हा उद्देश होता.

Goa Budget Session
Goa University Job: गोवा विद्यापीठात अध्यापक पदांसाठी एवढ्या जागा रिक्त; यामुळे थांबली होती भरती प्रक्रिया

मंत्री, आमदारांना किट्सचे वाटप

पोषक भरडधान्यांचा वापर आहारात केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. मंत्र्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी विधानसभेत सर्व मंत्री, आमदांना लाकडी टोपल्यांमध्ये पोषक भरडधान्यांच्या किट्स वाटण्यात आल्या. त्‍याचे, मंत्री आमदारांनी स्वागतही केली. भरड धान्यापासून बनवलेले अनेक पदार्थ दुपारच्या जेवणात ठेवण्‍यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com