Mopa Airport parking fee taxi protest Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: वाढीव पार्किंग शुल्क मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन! मोपातील टॅक्सी व्यावसायिकांचा सरकारला इशारा

Mopa Airport Parking Fee: मोपा विमानतळ टॅक्सी धारकांनी गोवा प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व खासदार सदानंद तानावडे यांची भेट घेउन पे पार्किंग दरा संबंधी चर्चा केली.

Sameer Panditrao

पेडणे: मोपा विमानतळावर वाढविलेले पार्किंग शुल्क त्वरित कमी करावे अन्‍यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिव वॉरियर्स टॅक्सी संघटनेने दिला आहे.

नागझर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिव वॉरियसचे अध्यक्ष रामा वारंग, सचिव निखिल महाले, आनंद गावस, प्रदीप पटेकर व टॅक्सी व्यावसायिक उपस्थित होते. ‘जीएमआर’ कंपनी टॅक्सी व्यावसायिकांवर अन्याय करीत असून ही कंपनी सरकारलाही घाबरत नाही.

या कंपनीने कुणालाच विश्वासात न घेता विमानतळावर पार्किंग शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे यावेळी सांगण्यात आले.

आनंद गावस यांनी सांगितले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंपनीचे अधिकारी व टॅक्सी व्यावसायिक संघटनेसमवेत घेतलेल्या बैठकीत विमानतळावर पार्किंग शुल्क, भाडेदर वाढवताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असे नमूद केले होते.

रु. ८० वरून थेट २०० वर शुल्क

संघटनेचे सचिव निखिल महाले यांनी सांगितले, जीएमआर कंपनीने ८० रुपये असलेली पार्किंग फी थेट दोनशे रुपयांवर नेली आहे. हा दर जर नियंत्रणात आला नाही तर रस्त्यावर उतरण्यावाचून पर्याय राहणार नाही.

दामू नाईक, तानावडेंची घेतली भेट

दरम्यान मोपा विमानतळ टॅक्सी धारकांनी गुरुवारी संध्याकाळी गोवा प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व खासदार सदानंद तानावडे यांची भेट घेउन पे पार्किंग दरा संबंधी चर्चा केली.त्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT