Mopa Link Road Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोडच्या कामाला पंचायत संचलनालयाचा हिरवा कंदील

वारखंड नागझर पंचायतीला काम थांबवण्याची नोटीस मागे घेण्याचे आदेश

दैनिक गोमन्तक

पणजी : मोपा विमानतळ लिंक रोडच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पंचायत संचलनालयाने वारखंड नागझर पंचायतीला काम थांबवण्याची नोटीस मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. लिंक रोडला होणारा मोठा विरोध लक्षात घेत पंचायत संचलनालयानेच आता याप्रकरणी हस्तक्षेप केला आहे. कंत्राटदाराने याप्रकरणी दाद मागितली होती.

मोपा (Mopa) लिंक रोडच्या कामाविरोधात पंचालय संचलनालयाकडे दावा करण्यात आला होता. याप्रकरणी आज पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांच्यासमोर सुनावणी झाली. हा प्रकल्प लोकांच्या हितासाठी फार महत्त्वाचा असून राज्याची अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे. ग्राम पंचायतींना हे काम थांबवण्याचा कोणताही अधिकार नाही. हा सरकारी (Goa Government) प्रकल्प असल्याने लोकांच्या हितासाठीच याचं काम सुरु आहे, असे ताशेरे पंचायत संचालकांनी ओढले आहेत.

मोपा लिंक रोडसाठी पर्यावरण खातं आणि वन खात्याची परवानगी नसल्याचा दावा पंचायतीकडून करण्यात आला होता. मात्र हा दावाही संचालकांनी खोडून काढला आहे. प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळालेल्या असून वन खात्याने झाडं तोडण्याची परवानगी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मोपा विमानतळ (Mopa Airport) लिंक रोड हा मोपा विमानतळ प्रकल्पापासून वेगळा करता येणार नाही. त्यामुळे पंचायतींनी काम थांबवण्याची नोटीस मागे घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र पंचायतीने या निवाड्याविरोधात हायकोर्टात जाण्याचा आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT