साळवासीयांची मोबाईल टॉवरची स्वप्नपूर्ती लवकरच !

साळमध्ये टॉवर नसल्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थिवर्गाचे नेटवर्कअभावी नुकसान होत होते.
mobile tower
mobile towerDainik Gomantak
Published on
Updated on

साळ: डिचोली तालुक्यातील साळ या गावात एकही मोबाईल टॉवर नव्हता. तसेच भारत दूरसंचार निगम(बीएसएनएल)ची सेवाही होत विस्कळीत होती. वेळोवेळी बिघाड होत असल्यामुळे ग्राहक पुरते वैतागले होते. या पार्श्वभूमीवर पंचायतीने व देवस्थान समितीने ‘आम्यानी’ भागात टॉवर उभारणीला मंजुरी दिली. त्यामुळे साळवासीयांचे मोबाईल टॉवरची स्वप्नपूर्ती होणार आहे.

तसेच कोरोना काळात ऑनलाइन शाळा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे नोकरदारांनाही याशिवाय पर्याय नव्हता. पण साळमध्ये टॉवर नसल्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थिवर्गाचे नेटवर्कअभावी नुकसान होत होते.

mobile tower
'मडगाव शहरातील नाल्यांची तातडीने तपासणी करावी'

जनतेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे कित्येकदा पत्रव्यवहार करून मागणी केली होती. पण योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. काहीवेळा टॉवर उभारणीसाठी जागेची अडचण जाणवत होती.पण काही महिन्यांपूर्वी देवस्थान मंडळाच्या वतीने अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब यांनी देवस्थान कमिटीच्या मंजुरीने यासाठी ‘आम्यानी’ भागात टॉवर उभारणीला मंजुरी दिली. मात्र, तिथेही काही अडचणी येत होत्या, पण त्यांचे निराकरण केले. काम सुरू झाले नि येत्या दोन दिवसात टॉवर उभारणी पूर्ण होणार, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Murder Case
Goa Cyber Crime
Goa IIT
Goa Social Media Ban
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com