Goa Snake Friends: जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा!

सर्पमित्रांची धाडसी कामगिरी: विषारी-बिनविषारी सर्पांना जीवदान
Goa Snake Friend Pradip Gavandalkar
Goa Snake Friend Pradip GavandalkarDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: साप म्हटला, की प्रत्येकाच्या मनात थरकाप उडत असतो. मग तो बिनविषारी देखील का असेना, समोर दिसला की भीती वाटतेच. पण काही माणसे धाडसी असतात. अशा व्यक्ती क्वचितच समाजात दिसून येतात. ही माणसे जीवाची तमा न बाळगता अगदी जीव धोक्यात घालून घरात आलेल्या विषारी सापांना पकडतात आणि जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडतात. सत्तरी तालुक्यात अनेक सर्पमित्र आहेत ,जे कोणत्याही वेळी घटनास्थळी धावून जीवाची पर्वा न करता महाकाय साप पकडून जीवदान देतात.

सत्तरीत विनोद सावंत, रमेश झर्मेकर, विठ्ठल शेळके, प्रदीप गवंडळकर, सचिन गावस, विराज नाईक, विशांत गावकर, सुरेन राणे, विशांत नाईक, योगेश गावस, विशाल शिरोडकर, आनंद मेळेकर, सुदेश सावईकर आदी सर्पमित्र अहोरात्र ग्रामीण भागात सामाजिक योगदान देत आहेत.

Goa Snake Friend Pradip Gavandalkar
'डिचोलीतील पायाभूत सुविधा मजबूत करणार'

वाळपईत सर्पमित्र म्हणून प्रदीप गवंडळकर परिचित आहेत. ग्रामीण भागातून कधीही, कोणीही साप आल्याची माहिती देऊ दे, प्रदीप हातातले काम सोडून लगेच घटनास्थळी दाखल होतात. प्रदीप हे शिंपी म्हणून वाळपईत कार्यरत आहेत. लहानसे दुकान टाकून शिंपी व्यवसाय चालवतात. ते मूळचे कर्नाटकातील दांडेलीचे. साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. तो लोकवस्तीत आला म्हणून त्याला मारणे योग्य नाही. ही मौलिक जैवसंपदा टिकविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. हल्लीच झर्मे गावात दोन किंग कोब्रा पकडण्यात आले आहेत. प्रदीपप्रमाणेच अन्य सर्प मित्रही योगदान देत आहेत. प्रदीप हे ॲनिमल रेस्क्यू स्कॉडचे सदस्यही आहेत.

Goa Snake Friend Pradip Gavandalkar
साळवासीयांची मोबाईल टॉवरची स्वप्नपूर्ती लवकरच !

45 किंग कोब्रा, 500 नागांना अभय

प्रदीप यांनी गेल्या नऊ वर्षांत 45 किंग कोब्रा, 500 हून कोब्रा नाग, तसेच धामण, नानाटी, हरणटोळ, अजगर, काणेर आदी विविध प्रकारचे विषारी, बिनविषारी, निमविषारी साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. प्रदीप हे गेली 20 वर्षे सर्पमित्रांबरोबरच विद्यार्थ्यांना घेऊन घनदाट जंगलात, डोंगराळ भागात पदभ्रण मोहीमदेखील राबवितात. तसेच खडकाळ भागात साहसी खेळही घेतात. वन्य प्राणी तसेच विहिरीत पडलेल्यांनाही जीवदान देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com