Mopa Airport Taxi Protest Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: Blue Cab Taxi काउंटरवर बंदी नको! 'मोपा'वरील टॅक्सी व्यावसायिकांची मागणी, मामलेदार कार्यालयात बैठक

Blue Taxi counter Mopa Airport: मोपा विमानतळावर ब्लू टॅक्सी काउंटर वारंवार बंद करण्याचा आदेश कंपनी देत असल्याने व्यावसायिकांनी आपल्या टॅक्सी पेडणे बाजारात ठेवून बैठक बोलवली.

Sameer Panditrao

पेडणे: आमच्या मागण्यासाठी नेहमीच आम्हाला टॅक्सी काउंटर बंद करून आमदार, मुख्यमंत्र्यांकडे जावे लागत आहे. जीएमआर कंपनीबरोबर बैठका करून कोणताच तोडगा निघाला नाही. उलट काउंटर बंद करण्याचा आदेश दिला जातो, अशी माहिती टॅक्सी व्यावसायिकांनी दिली.

मोपा विमानतळावर ब्लू टॅक्सी काउंटर वारंवार बंद करण्याचा आदेश जीएमआर कंपनी देत असल्याने आज टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या टॅक्सी पेडणे बाजारात ठेवून मामलेदार कार्यालयात बैठक बोलवली. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, मामलेदार रणजीत साळगावकर, वाहतूक अधिकारी व टॅक्सीचालक, चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस उपस्थित होते.

गावस म्हणाले, मी टॅक्सीधारकासोबत असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. आमदार आर्लेकर म्हणाले, व्यावसायिकांच्या समस्या आपण जवळून ऐकलेल्या आहेत. आपण स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या समस्या सर्व मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

...तर परवाने परत!

टॅक्सी व्यावसायिक म्हणाले, जर सरकारने आम्हांला परत काउंटर उपलब्ध करून दिला नाही, तर ज्या विभागाने आम्हांला परवाने दिलेले आहेत. ते परवाने आम्ही परत करणार आहोत. तसेच वाहनांच्याही चाव्याही त्यांच्या हवाली सुपूर्द करण्यात येतील. आमचा काउंटर सुरू करावा, तो कधीच बंद करू नये, यासाठी सरकारने आम्हांला न्याय द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar Engaged: सचिनच्या लेकानं बालपणीच्या मैत्रिणीसोबत उरकला साखरपुडा; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सुन?

Salpe Lake Pollution: साळपे तलावात सांडपाणी सोडणे ताबडतोब थांबवा! प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाचा आदेश

Crime News: रंगकामाचा बहाणा करून 4 लाखांच्या सोन्याच्या कड्या चोरल्या, पुण्‍यातील चोरट्याला म्‍हापशात अटक

Illegal Sand Mining Goa: राज्‍याची संपत्ती सांभाळा, बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी अधिकाऱ्यांना न्‍यायालयाचे निर्देश

Communidade Land: सावईवेरे कोमुनिदाद कुणाच्या हिताआड येणार नाही पण...! पदाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT