Goa Market Dainik Gomantak
गोवा

Goa Market: कोंब, फागले, तायकिळा, अळू बाजारात दाखल; पावसाळ्यातील रानभाज्यांना वाढली मागणी, शहरी नागरिकांकडून अधिक खरेदी

Monsoon Wild Vegetables Goa: भाज्या आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आणि पावसातच मिळत असल्याने शहरी भागातील नागरिक त्या विकत घेत रानभाज्यांचा आस्वाद घेत आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ऋतूमानानुसार बाजारात दाखल होणाऱ्या पावसाळी रानभाज्या दाखल झाल्या असून बांबूचे कोंब, कारल्यासारखी दिसणारी, परंतु आकाराने लहान असलेली फागले, कुर्डू, तायकिळा, अळू आणि इतर भाज्या बाजारात स्थानिक महिला विकत असून या भाज्यांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आणि पावसातच मिळत असल्याने शहरी भागातील नागरिक त्या विकत घेत रानभाज्यांचा आस्वाद घेत आहेत. बांबूचे कोंब आकाराप्रमाणे १०० ते २५० रुपये प्रती नग दराने विकले जात आहेत. फागले १६० रुपये किलो, तर कुर्डूची भाजी ५० रुपयांना तीन ते चार मोळी दराने विकली जात आहे.

कांदे बटाट्याचे दर स्थिर

रानभाज्यासोबतच बाजारात इतर भाज्यांना देखील चांगली मागणी असून कांदे, बटाटे व इतर भाज्यांचे दर आठवड्याभरापासून स्थिर आहेत. टॉमेटो प्रती किलो ५० रुपये दराने विकले जात आहेत. कोथंबिरीची जुडी ४० रुपये, तर पावसाळ्यात देखील वाढत्या उष्म्यामुळे लिंबूचे दर वाढलेलेच आहेत. एक लिंबू ५ रुपयांना विकला जात आहे.

नारळाचे वाढलेले दर काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मध्यम आकाराचा एक नारळ ४० ते ५० रुपये दराने विकला जात आहे. आले ३०० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. त्यासोबतच बाजारात फळांचे दर देखील वाढले आहे. सफरचंद २८० ते ३५० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. मोसंबी २०० रुपये, केळी ८० रुपये डझन दराने विकली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

Goa Language Politics: गोमंतकीय भाषावादाची वृद्धावस्थेकडे वाटचाल? 'राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा'नंतरही निर्धार समितीचा तिसरा पर्याय कुठे हरवला?

SCROLL FOR NEXT