monsoon news today Dainik Gomantak
गोवा

Monsoon Update: मान्सूनने गोवा व्यापला, वेगाने आगेकूच; महाराष्ट्रात लवकरच करणार एंट्री!

Goa weather update: भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या काही भागांत, कर्नाटकातील अधिक भागांत आणि संपूर्ण गोवा व्यापला आहे

Akshata Chhatre

IMD monsoon update: अखेर, शेतकऱ्यांसाठी आणि उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनने रविवार (२५ मे ) रोजी वेगाने आगेकूच केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मन्सूनने पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या काही भागांत, कर्नाटकातील अधिक भागांत आणि संपूर्ण गोवा व्यापला आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या काही भागांत, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरात, तसेच मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागांतही मान्सूनने धडक दिली आहे.

पुढील ३ दिवसांत मान्सूनची दमदार वाटचाल

पुढील तीन दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही आणखी भागांमध्ये, मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये, बंगळूरूसह कर्नाटकात, आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये, तामिळनाडूच्या उर्वरित भागांमध्ये

पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही अधिक भागांमध्ये आणि ईशान्येकडील राज्यांच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

Goa Rain Update

याचा अर्थ असा की, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मान्सूनचे जोरदार आगमन होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून, यामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. तसेच, वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार, आता पावसाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

SCROLL FOR NEXT