Monsoon in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आठवड्याभरात मॉन्सून दाखल

हवामान तज्ज्ञांचा अंदाज : दोन-तीन दिवसात केरळमध्ये पोहोचणार

दैनिक गोमन्तक

पणजी : बंगालच्या उपसागर आणि अंदमान-निकोबारमध्ये पाच दिवस अगोदर दाखल झालेला मॉन्सूनला अरबी समुद्रात पोषक स्थिती मिळाली नसल्याने मॉन्सून तीन दिवस तिथेच रेंगाळला होता. आता काहीशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मॉन्सून येत्या दोन ते तीन दिवसात केरळात पोहचण्याची शक्यता आहे. म्हणजे एक जूनच्या आसपास केरळात आणि पाच जूनला राज्यात येऊ शकतो असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थात या नैसर्गिक स्थितीत कधीही बदल होऊ शकतात. त्यामुळे सध्यातरी मॉन्सूनची प्रतीक्षा थोडी लांबणीवर जाणार असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात मान्सून वारे लवकर निर्माण झाल्याने अंदमान-निकोबारमध्ये चक्क पाच दिवस अगोदर 20 मे रोजी मॉन्सून दाखल झाला होता. या अंदाजानुसारच मॉन्सून 27 मे च्या दरम्यान केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानुसार वेळेआधीच त्याचा प्रवास सुरू होऊन 1 जून रोजी गोव्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र, दक्षिण अरबी समुद्रात मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती मिळाली नाही त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने मॉन्सून दक्षिण अरबी समुद्र चक्क तीन ते चार दिवस रेंगाळला.

त्यामुळेच वेळेआधी केरळ मध्ये दाखल होणारा मॉन्सून पुन्हा लांबला असल्याचे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा मॉन्सून वेळेत म्हणजे एक जूनला केरळ आणि पाच जूनला गोव्यात येऊ शकतो असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. कदाचित मॉन्सून एक दोन दिवस मागेपुढे होऊ शकतो.

मॉन्सून चक्राची अनियमितता

मॉन्सूनबाबत हवामान खात्याने काही ठोकताळे बांधलेले आहेत. त्याप्रमाणे मॉन्सून 1 जूनला केरळ मध्ये प्रवेश करतो आणि पुढे 38 दिवसांत पूर्ण देश व्यापतो असा अंदाज आहे. पण अनेकदा मॉन्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला आहे. गत वर्षी 3 जूनला तो केरळमध्ये आला व 5 जूनला राज्यात दाखल झाला होता. त्यामुळे हवामान खात्याचे अंदाज हे अंदाजच असतात असे अनेक वेळेला अनुभवयास आले आहे.

हवामान खात्याच्या पुर्वअनुभवानुसार मॉन्सून 45 दिवसात देश व्यापतो. आता नवीन निकषांनूसार 38 दिवस लागतात. मात्र, 2013 मध्ये मॉन्सूनने केवळ 16 दिवसांमध्ये देश व्यापला होता. याच वर्षी अतिपावसाने केदारनाथ दुर्घटना घडली होती. तर २००२ मध्ये मान्सून अत्यंत धिम्या थंड गतीने देश व्यापला होता. त्यावेळी 75 दिवसांमध्ये देश व्यापला होता. त्यामुळे मान्सून बाबतचे अंदाज व्यक्त करताना हवामान खात्याला आणि बाबींचा विचार करावा लागतो. प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग, वाऱ्यांची उंची आणि दिशा हे ठरवूनच मान्सूनच्या पुढील वाटचालीचे अंदाज बांधले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa Crime: वाळपई हादरली! 41 वर्षीय महिलेचे अपहरण करुन जंगलात लैंगिक अत्याचार; अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

SCROLL FOR NEXT