पंडित बाळकृष्ण केळकर स्मृतीप्रीत्यर्थ पणजीत राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धा

नाट्यगीत गायन स्पर्धेमध्ये एकूण 18 स्पर्धक अंतिम फेरीत घेणार भाग
Balkrishna Kelkar
Balkrishna KelkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोमंतकीय संगीत सृष्टीमध्ये आपल्या कार्याची छाप सोडणाऱ्या आदरणीय गुरू पंडित बाळकृष्ण केळकर यांचा पहिला स्मृतीदिन पणजीत साजरा केला जाणार आहे. केळकर बुवांच्या स्मृती प्रित्यर्थ "अभिजात सूर" या राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Balkrishna Kelkar
Top 5 Goa News | गोंयच्यो व्हडल्यो 5 खबरो (27th May 2022)

ही स्पर्धा 29 मे रोजी दुपारी 3 वाजता मिनेझिस ब्रागंझा हॉल पणजी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिनेझिस ब्रागांझाचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर, गोमंन्तकचे व्यवस्थापक सचिन पोवार, गोमन्तक टीव्हीचे शैलेंद्र मेहता, तसेच अनिल शेलार उपस्थित राहणार आहेत.

Natyageet Singing Competition
Natyageet Singing Competition Dainik Gomantak

पणजीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पं सुधाकर करंदीकर यांची खास उपस्थिती असेल. राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. स्पर्धेमध्ये एकूण 18 स्पर्धक अंतिम फेरीत भाग घेणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास नक्की उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com