Mapusa Electricity Pole Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेच्या तिजोरीत खडखडाट! विकासकामे थांबली

Mapusa News: आमदारांनी विकासकामांसाठी अधिक निधी मिळवून द्यावा; नगरसेवक सुधीर कांदोळकर

गोमन्तक डिजिटल टीम

पैशांअभावी सध्या म्हापसा पालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे अडली आहेत. त्यासाठी म्हापसा मतदारसंघाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी सरकारकडून या नगरपालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी अधिक निधी मिळवून द्यावा, अशी मागणी म्हापसा पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी केली आहे.

म्हापसा क्लिनिकजवळ असलेली संरक्षण भिंत पडली होती, त्यावेळी तेथील विजेचा खांबही कमकुवत झाला होता. तो म्हापसा वीज कार्यालयांतर्गत दुरुस्त करून तुटलेल्या विजेच्या तारा घालण्याचे काम सुरू असताना त्याची पाहणी करण्यास नगरसेवक सुधीर कांदोळकर आले होते.

त्यावेळी त्यांना भिंत कोसळण्यामागील कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की डोंगर माथ्यावरून येत असलेले पाणी या भिंतीवर आदळते आणि या ठिकाणी पाणी साचून राहते. त्यावेळी ही भिंत तुम्ही पालिकेतर्फे बांधणार आहात का? असे विचारले असता, पालिकेजवळ पैसा नाही.

त्यामुळे लवकरात लवकर या भिंतीचे काम जलसिंचन खात्यांतर्गत बांधून घेण्यासाठी आपली खटपट असेल व त्यांच्याकडून ती बांधून घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

गेल्या आठवड्यात या ठिकाणी गटार बांधले होते, पण ते कुचकामी ठरले आहे. कारण डोंगर माथ्यावरून चिखल, माती वाहून येऊन गटार तुंबले आहे. त्यामुळे संरक्षक भिंतही कमकुवत झाली आहे.

दरम्यान, येथील विजेचा खांब पडू नये म्हणून वीज खात्याकडून तो दुरुस्त करून घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दोन वर्षांपासून निधीच नाही

आम्हा प्रत्येक नगरसेवकांना प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी दिला जातो, पण गेल्या दोन वर्षांपासून ते दिले गेले नसल्याने अनेक कामे झाले नाहीत. यासाठी आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी राहिलेले दोन वर्षांचे ३० लाख रुपये आणि सरकारकडून आणखी निधी पालिकेला मिळवून देण्याची मागणी नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी केली.

मलनिःसारणाचे काम ठप्प

गेल्या काही वर्षांपासून म्हापशातील मलनिःसारणाचे काम ठप्प झाले आहे. ज्याला हे कंत्राट दिले होते त्याने ते पूर्ण करणे आवश्यक होते, पण त्याने ते केले नाही. मलनिःसारण प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार होता, परंतु तो अर्धवट राहिलेला आहे. त्यामुळे म्हापशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सेप्टिक टॅंकमधील घाण मडगाव व इतर ठिकाणी नेण्यासाठी टँकरवाल्यांना ८ ते ९ हजार रुपये एका टँकरमागे नागरिकांना द्यावे लागतात, असे कांदोळकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT