Mapusa Bus Stand: म्हापसा बसस्थानकात थाटले चहाचे दुकान! चेअरमनना पत्ताही नाही

Mapusa News: वाहतूक संचालनालयाने केटीसीएलला गेल्या १७ महिन्यांपूर्वी सूचना देऊनही सदर दुकान बिनदिक्कतपणे सुरू आहे
Mapusa News:  वाहतूक संचालनालयाने केटीसीएलला गेल्या १७ महिन्यांपूर्वी सूचना देऊनही सदर दुकान बिनदिक्कतपणे सुरू आहे
Mapusa Bus Stand Dainik Gomantak
Published on
Updated on

येथील जुन्या बसस्थानकावरील बस-बेवर (थांबा) अनधिकृतपणे उभारलेले वादग्रस्त चहाचे दुकान कार्यरत झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. सदर दुकान मोडण्याची सूचना वाहतूक संचालनालयाने केटीसीएलला गेल्या १७ महिन्यांपूर्वी देऊनही सदर दुकान बिनदिक्कतपणे सुरू झाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या एकंदरीत भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

यासंदर्भात केटीसीएलचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी वरील दुकानाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, की या प्रकाराबाबत आपण अनभिज्ञ असून अधिकाऱ्यामार्फत याची चौकशी करण्यास सांगतो, असे त्यांनी सांगितले.

माजी केटीसीएलच्या चेअरमनच्या नातेवाइकांकडून मडगाव, फोंडा व म्हापसा शहरातील बसस्थानकावर अशाप्रकारे चहाचे दुकान उभे राहिले आहे, अशी माहिती तुयेकरांना माध्यमांना दिली असता ते म्हणाले, कोणीही केटीसीएलचे चेअरमन झाले, तरी बसस्थानक आमचे नसते.

मागील अडीज वर्षे मी केटीसीएलचा चेअरमन आहे, परंतु कुठलाही फायदा मी स्वतःसाठी करून घेतलेला नाही. आम्हांला वर्षाला विमानाने राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी पाच ते सहावेळा विमान तिकिटे मिळतात, परंतु एकदाही या सुविधेचा मी लाभ घेतला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सध्या कंदबा तोट्यात आहे, यात आणखीन भर घालणे योग्य नव्हे. यापूर्वी जे काही घडलेले आहे, त्याची मला कल्पना नाही. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांना कदंब बसचे पास (सबसिडी) मिळायचे, ती सुविधा सरकारने आता बंद केली. यातून कंदबाचे २ कोटी रुपये वाचणार आहेत. म्हापसा बसस्थानकावरील बस-बेवरील या चहाच्या दुकानाची मी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करतो आणि यात काही चूक असल्यास कारवाई नक्की केली जाईल, असे आश्वासन तुयेकरांनी यावेळी दिले.

Mapusa News:  वाहतूक संचालनालयाने केटीसीएलला गेल्या १७ महिन्यांपूर्वी सूचना देऊनही सदर दुकान बिनदिक्कतपणे सुरू आहे
Mapusa Municipal Council: वादग्रस्त शेड उभारणीस म्हापसा पालिकेने दिला हिरवा कंदील!

...कार्यवाही नाहीच!

येथील कदंबा बसस्थानकाच्या प्रवासी विश्रांती फाटकावर (प्लॅटफॉर्म) अतिक्रमण करून तिथे अनधिकृत दुकान उभारले होते. परिणामी, गोवा कॅनने याविषयी वाहतूक खात्याकडे लेखी तक्रार करुनही हे दुकान सध्या कार्यरत आहे. सदर दुकान हटवून ही जागा पूर्ववत करावी व अहवाल सादर करावा, असा आदेश वाहतूक खात्याने कदंब महामंडळाला नोव्हेंबर २०२२मध्ये दिला. मात्र या आदेशाची गेली दोन वर्षे कार्यवाहीच झालेली नाही.

Mapusa News:  वाहतूक संचालनालयाने केटीसीएलला गेल्या १७ महिन्यांपूर्वी सूचना देऊनही सदर दुकान बिनदिक्कतपणे सुरू आहे
Mapusa News: कचरा टाकल्यास म्हापसा पालिका ठोठावणार दंड

ग्राहक समितीला निवेदन

म्हापसा कदंब बसस्थानकाची मालमत्ता वाहतूक खात्याची आहे. खात्याने ही जागा भाडेतत्त्वावर कदंब परिवहन महामंडळ लिमिटेडला वापर व देखरेखीसाठी दिली आहे. मात्र या बसस्थानकाच्या एका बाजूच्या प्रवासी थांबण्याच्या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीररीत्या चहा दुकानांत रूपांतरित केले आहे. या कथित गैरप्रचाराबाबत ओवेन ब्रागांझा यांनी देखील ग्राहक सलोखा समितीला निवेदन लिहून संबंधित प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com