Ekoshi Anganwadi Fire: एकोशीत अंगणवाडीला आग, संशयित अजूनही मोकाट! ना एफआयआर, ना अटक; मुलांचा जीव धोक्‍यात

Ekoshi Anganwadi Fire In Goa: एकोशी येथील अंगणवाडीच्या आवारात मुद्दाम लावण्‍यात आलेल्‍या आगीच्या प्रकरणात प्रशासनाची अक्षम्‍य उदासीनता उघड झाली आहे.
Ekoshi Anganwadi Fire In Goa
Ekoshi Anganwadi FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एकोशी येथील अंगणवाडीच्या आवारात मुद्दाम लावण्‍यात आलेल्‍या आगीच्या प्रकरणात प्रशासनाची अक्षम्‍य उदासीनता उघड झाली आहे. जमिनीच्‍या वादातून हे प्रकरण घडले असले तरी त्‍यामुळे चिमुकल्‍या मुलांची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. संध्‍याकाळची वेळ असल्‍याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्‍हणजे या प्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही की कोणाला अटक झालेली नाही. दरम्‍यान, या घटनेमुळे हणजूण येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्‍लबमध्‍ये घडलेल्‍या अग्नितांडवाच्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या.

ही घटना ६ मार्च रोजी हळर्णवाडा-एकोशी येथे घडली होती. त्‍यात अंगणवाडीचे प्‍लास्‍टिक ताडपत्रीचे छप्‍पर जळून खाक झाले. तसेच अन्‍य वस्‍तूंनाही आगीची झळ बसली. या प्रकरणी स्थानिक रहिवासी चंद्रकांत हळर्णकर यांनी ९ मार्च रोजी शिक्षण विभाग व उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर १६ मार्च रोजी पर्वरी पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. आपल्या तक्रारीत त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्‍लबमध्‍ये घडलेल्या भीषण आगीच्या घटनेचा उल्लेख करत, एकोशीमध्येही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ekoshi Anganwadi Fire In Goa
CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

अज्ञात आरोपींविरोधात आयपीसी कलम ४३६ (सार्वजनिक वास्तू जाळण्याचा प्रयत्न) आणि कलम ४३५ (मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी आग लावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अंगणवाडीसारख्या संवेदनशील ठिकाणी घटना घडूनही अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही. पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने पाहणी करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तपासात होत असलेल्या विलंबामुळे प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा धोरण अवलंबत आहे का? असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिक्षण विभागाकडे तक्रार दखल घेणे बाकी

या प्रकरणावर शिक्षण संचालनालयाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. अंगणवाडीबाबत अशी घटना घडूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकारी शाळेत आग लावणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचे हळर्णकर यांनी म्हटले आहे.

Ekoshi Anganwadi Fire In Goa
Mahakumbh 2025 : मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची सहकुटुंब कुंभमेळ्यात हजेरी; त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान

पोलिसांची भूमिका काय?

या प्रकरणी पर्वरी पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, एका स्थानिक नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. मात्र, संबंधित जागा शिक्षण विभागाच्या मालकीची असल्याने ती तक्रार पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण संचालनालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्‍या विभागाकडून अधिकृत तक्रार नोंदविल्याशिवाय पोलिसांना एफआयआर दाखल करता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com