WagonR accident Mollem Dainik Gomantak
गोवा

Mollem Accident: मोलेतील धोकादायक वळणावर भीषण अपघात; ट्रक-वॅगनरच्या धडकेत चौघे जखमी

Goa road accident: कर्नाटकहून येणाऱ्या या ट्रकचे नियंत्रण गेल्याने ट्रकाने वळणाच्या बाजूला असलेल्या क्रूसाला धडक दिली, तिथेच असलेल्या एका झाडामुळे ट्रक दरीत कोसळताना वाचला

Akshata Chhatre

मोले: राष्ट्रीय महामार्गवरील दुधसागर देवस्थान ठिकाणी असलेल्या वळणावर ट्र्क व वॅगनर यांच्यात बुधवार (दि.२३)रोजी दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात एकूण चौघे जखमी झाले असून त्यांना त्वरित उपचारांसाठी पिळये हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेय. कर्नाटकहून येणाऱ्या या ट्रकचे नियंत्रण गेल्याने ट्रकाने वळणाच्या बाजूला असलेल्या क्रूसाला धडक दिली, तिथेच असलेल्या एका झाडामुळे ट्रक दरीत कोसळताना बचावला.

अद्याप या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावं समोर आलेली नाहीत. कर्नाटकमधून येणाऱ्या या ट्रकमध्ये सिमेंटचा भलामोठा लोड होता, तर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मडगावमधली वॅगनर गाडी बेळगांवच्या दिशेने चालली होती.

मोले राष्ट्रीय महामार्गवर याच ठिकाणी एक मंदिर आहे, आणि इथून जाणारा प्रत्येक चालक मंदिरात नक्कीच भेट देतो.

त्याचप्रामणे मडगावमधून आलेला ट्रक चालक देखील गाडी बाजूला पार्क करून मंदिरात जाण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात घडला. यावेळी झालेल्या अपघातात ट्रकमधील दोघांसमवेत वॅगनर गाडीमधील जखमी असलेल्या दोघांवर सध्या उपचार सुरु आहेत.

प्रत्यक्षदर्शी स्थानिक विक्रेत्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हा ट्र्क वेगाने येत असता थेट गाडीला धडक बसली. गाडीमधून उतरण्याच्या तयारीत असलेल्या लोकांना फुरसत देखील मिळाली नाही. ट्रेकाने क्रूसाला धडक दिलीच मात्र झाडाला अडकल्यामुळे ट्रक दरीत कोसळला नाही. या अपघातांची घटना सकाळी ७:३० ते ८ च्या सुमारास झाल्याचं तिने सांगितलं. कुळे पोलिसांकडून पोलीस निरीक्षक राघोबा कामात यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT