Yuri Alemao news | Goa Assembly session Dainik Gomantak
गोवा

'नेहरुंचे नव्हे हे मोदींचे जॅकेट'; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्री सावंतांचा सिक्सर

Goa Assembly Monsoon Session 2025: ४३८ उमेदवारांपैकी २३६ जणांना नोकरी देण्यात आल्या असून, केवळ २५ जण उरले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Pramod Yadav

पर्वरी: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात मुख्यमंत्री सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यात शाब्दीक टोलेबाजी पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री सावंत यांनी घातलेल्या जॅकेटला नेहरुंसारखे जॅकेट असल्याचे आलेमाव म्हणताच मुख्यमंत्री सावंत यांनी हजरजबाबीपणे उत्तर देत ते मोदींचे जॅकेट अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, गोवा मुक्तीसाठी १४ वर्षे उशीर झाल्याचा उल्लेख देखील सभागृहात झाला.

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या सरकारी नोकरी देण्याबाबतचा मुद्दा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभागृहात उपस्थित केला. राज्यात अद्याप २०२ उमेदवारांना नोकरी मिळाली नसल्याचा दावा आलेमाव यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी जीत आरोलकरांना दिलेल्या उत्तराचा आलेमाव यांनी यावेळी संदर्भ दिला. ४३८ उमेदवारांपैकी २३६ जणांना नोकरी देण्यात आल्या असून, केवळ २५ उरले असल्याचे सांगितले होते. पण, आलेमाव यांनी गणित समजावून सांगत तो फरक १७७ एवढा असून, अधिक २५ केल्यास ती संख्या २०२ एवढी होते, असे सांगितले.

एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री त्यांच्याच कार्यकाळात स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकरी दिल्याचा दावा करत असतील तर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, रवी नाईक यांनी काहीच केले नाही का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

नेहरुंमुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास उशीर झाल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकरी देण्यात झालेला विलंब केव्हा भरुन काढणार, त्यांच्या कार्यकाळाला सहा वर्षे पूर्ण झालीयेत, असेही आलेमाव म्हणाले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली, इच्छुकांना अर्ज करण्याची विनंती करण्यात आली. ४३८ पैकी २३६ जणांना नोकरी देण्याचे काम माझ्या कार्यकाळात झाले असे मी अभिमानाने सांगतो. बाकीचे १९६ उरलेल्या ५० वर्षात देण्यात आले, असे उत्तर मुख्यमंत्री सावंतांनी दिले. आता केवळ २५ जण उरल्याचे सावंत यांनी सांगितले.

उरलेल्यांसाठी योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी आलेमाव यांनी केली. पण, कोणीच उरले नसल्याने योजना पुन्हा सुरु करण्याची गरज नसल्याचे सावंत म्हणाले. यावेळी सावंत यांनी गोवा मुक्तीसाठी नेहरुंमुळे १४ वर्षे विलंब झाल्याचे आलेमाव यांनीच उल्लेख केल्याचे सभागृहात नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona Raid: घरात चालायचा 'जुगार' अड्डा! कर्नाटकातील 40 संशयितांच्या मुसक्या आवळल्या; काणकोणात 16 लाखांचा ऐवज जप्‍त

Goa State Loan: गोव्यावर 33957 कोटींपेक्षा अधिक कर्ज! CM सावंत यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

Lokmanya Tilak: 'केसरी'चं निर्भीड उत्तर, 'वर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट'विरोधात लोकमान्य टिळकांची लेखणी ठरली शस्त्र

Rashi Bhavishya 23 July 2025: मान-सन्मान आणि सामाजिक प्रसिद्धीचा दिवस, मनासारखी संधी चालून येईल; योग्य निर्णय घ्या

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

SCROLL FOR NEXT