Gas Cylinder  Dainik Gomantak
गोवा

Gas Cylinder Price: मोदी सरकारच्या 'या' निर्णयाने सुशिक्षित बेरोजगारांना पकोडे तळणेही कठीण होईल- युरी आलेमाव

घरगुती सिलेंडरसाठी 1117 तर व्यावसायिक सिलिंडरसाठी 2118 रुपये द्यावे लागतील

गोमन्तक डिजिटल टीम

Gas Cylinder Price भाजप सरकारचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आज रुपये 50 वाढल्याने प्रत्येक सिलेंडरसाठी आता 1117 मोजावे लागतील तर व्यावसायिक सिलिंडर रुपये 350 वाढल्याने आता एका सिलिंडरसाठी रुपये 2118 द्यावे लागतील.

एकंदर परिस्थिती पाहता आता सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पकोडे तळणेही कठीण होईल, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

भाजप सरकारने घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या केलेल्या दरवाढीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकार सातत्याने जनतेवर आर्थिक बोजा टाकत असल्याचा गंभीर आरोप केला.

या दरवाढीमुळे घरघुती बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. असंवेदनशील भाजप सरकारने मध्यमवर्गीय आणि गरीबांवर लादलेली ही आर्थिक आणीबाणी आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वाढीमुळे रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रातील किमतीत वाढ होईल. आजची दरवाढ पाहिल्यास भाजप सरकार लोकांना उपाशी ठेवू इच्छित आहे असे स्पष्टपणे जाणवते असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोमंतकीयांनी आजची एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्याची घोषणा करण्याची वेळ लक्षात घ्यावी. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि 2 मार्च 2023 रोजी निकाल जाहीर होतील.

या तीन राज्यांतील लोकांना निवडणुकीपूर्वी भाजपकडून जुमल्यांचे आमिष दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात निकालाच्या एक दिवस आधी एलपीजीचे दर वाढविण्यात आले आहेत.

भाजप सरकार इंधन व गॅस सिलींडर दरवाढ वारंवार आणि सातत्याने करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

लोकसभा निवडणुका अवघ्या वर्षभरावर आहेत. भाजप सरकारचे श्रीमंताना पोषक आणि गरीब विरोधी धोरण जनतेने लक्षात घेण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जनता संताप व आक्रोश व्यक्त करणार नाही, तोपर्यंत भाजपचा पराभव करणे शक्य नाही, असे युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT