10 वर्षांत राज्‍यातील किनारपट्टीवरील 15.2 हेक्टर जमीन पाण्याखाली

धोका वाढला : ‘इस्रो’च्या स्पेस ॲप्‍लिकेशन सेंटरचा अहवाल
Agonda Beach |
Agonda Beach |Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Dainik Gomantak : निसर्गचक्रावरील अमर्याद मानवी हस्तक्षेपाबरोबर विविध कारणांनी किनारपट्टीची धूप वाढत आहे. गेल्या 10 वर्षांत तब्बल 15.2 हेक्टर गोव्यातील किनारपट्टीवरील जमिनीची धूप झाल्याचा अहवाल ‘इस्रो’च्या स्पेस ॲप्‍लिकेशन सेंटरने दिला आहे.

या प्रक्रियेचा वेग असाच राहिला तर राज्याला लाभलेल्या किनारपट्टीचा धोका वाढणार आहे. याचा परिणाम किनारपट्टी भागातील मानवी लोकवस्तीबरोबरच इतर जैवविविधतेलाही संभवतो.

Agonda Beach |
Holi 2023: होळीपूर्वी घरी आणा 'या' गोष्टी; कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

ग्लोबल वार्मिंगमुळे आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या दोन्ही ध्रुवावरील बर्फ वितळण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. हे संशोधनातून पुढे आले असून हीच स्थिती अन्य भागांमध्ये आहे. एकूण उष्णतेचे प्रमाणही वाढत आहे. अशा स्थितीत समुद्र, किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या 10 वर्षांत गोव्याला लाभलेल्या 103 किलोमीटरच्या किनारपट्टीपैकी तब्बल 15.2 हेक्टर किनारपट्टीची धूप झाली आहे, असा धक्कादायक अहवाल भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्‍या (इस्रो) ॲप्‍लिकेशन सेंटरने दिला आहे.

Agonda Beach |
Success Story : अनेक भाज्यांच्या उत्पादनाचा प्रयोग; 30 शेतकरी एकवटले

2016 आकडेवारीनुसार गोव्यातील किनारपट्टीच्या धुपीमुळे सुमारे 28.8 हेक्टर जमीन नष्ट झाली तर 13.6 हेक्‍टर जमीन अभिवृद्धीद्वारे प्राप्त झाली आहे. गोव्यासाठी प्रभावी जमिनीचे नुकसान 15.2 हेक्टर इतके आहे.

अभिवृद्धी वाढ ही समुद्रकिनाऱ्यावरील गाळ व वाळूच्या रूपाने किनाऱ्यावर किंवा किनाऱ्याच्या दृश्यमान भागाकडे परत येण्याची प्रक्रिया असते. ही स्थिती अशीच राहिली तर किनारी भागाला मोठा धोका संभवतो.

या प्रक्रियेमुळे एका ठिकाणी जमिनीची प्रभावी धूप होते आणि त्‍यामुळे नष्ट झालेली जमीन, माती किंवा वाळूच्या रूपात दुसऱ्या ठिकाणी एकत्रित येते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे किनारपट्टीचा धोका वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Paddy Crop Loss
Kodli Iron Ore Mining Project
Galjibaga Beach Erosion Goa
Canacona Coarse Farming Affected by Rain
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com