Goa Monsoon 2023 Orange alert Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : राज्यातील काही भागांत पुराची शक्यता; चार दिवस 'ऑरेंज अलर्ट'

मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे; हवामान खात्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 : मुसळधार पावसामुळे गोव्यातील काही भागांत पुराची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पुढील चार दिवस राज्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

त्यातच हवामान खात्याने काही भागांत पुराची शक्यता वर्तविल्यामुळे लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. तसेच पुरग्रस्त परिस्थितीसाठीही प्रशासन सज्ज आहे.

हवामान खात्याने राज्यात 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर 27 जुलै रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. पर्जन्यमान असेच राहिले तर पाऊस लवकरच इंचांचे शतक पूर्ण करण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

गेल्या चोवीस तासांत म्हापसा 101.2, पेडणे 115.8, पणजी 75.6, ओल्ड गोवा 117.0, साखळी 121.8, काणकोण 67.0, दाबोळी 81.0, मडगाव 46.0, मुरगाव 88.6, केपे 70.8आणि सांगे 80.6 मीमी पावासाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT