Goa Monsoon 2023 : डिचोलीत पूरसदृश स्थिती; बंदरवाडा येथील रस्ता पाण्याखाली

पंपिंग यंत्रणा सुरू
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim : गेल्या पाच-सहा दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या कोसळधार पावसाचा जोर आज (शनिवारी) किंचित कमी झाल्याने, डिचोलीत निर्माण झालेली पूरसदृश स्थिती नियंत्रणात आली आहे. कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर काहीसा मंदावल्याने तूर्तास पुराचा धोका टळला आहे. त्यामुळे जनतेनेही सुटकेचा श्वास घेतला असला, तरी अजूनही जनता भयमुक्त झालेली नाही. नदी बाहेर पसरलेले पाणी पंपिंगद्वारे नदीत सोडणे सुरू आहे.

दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्याने डिचोली शहरातील बंदरवाडा आदी भागात घुसलेले पाणी हळूहळू ओसरत आहे. दरम्यान, दिवसभराच्या तुलनेत आज सायंकाळी पावसाचा जोर जरा वाढला होता, तरी स्थिती नियंत्रणात होती. गेल्या पाच-सहा दिवसांपासून कहर केलेल्या पावसाने काल अक्षरशः रौद्रावतार धारण करताना सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ''कोसळधार''ने डिचोलीत हाहा:कार उडाला होता.

पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. बहुतेक भागात जलमय चित्र दिसून येत आहे. कोसळधार पावसामुळे काल सायंकाळपर्यंत डिचोलीसह अन्य नद्यांनी धोक्याची पातळी पार केली होती. मध्यरात्री तर नदीचे पाणी बाहेर फुटल्याने शहरातील बंदरवाडा आदी सकल भागात जलमय स्थिती निर्माण झाली होती.

बंदरवाडा येथे तर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. आज सकाळी दहा वाजेपर्यंत रस्ता पाण्याखाली होता. त्यामुळे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या जनतेला पाण्यातून वाट शोधावी लागली. वाहनचालकांवरही तोच प्रसंग आला होता.

Goa Monsoon 2023
Bicholim News : मधपेट्यांचे रहस्य उलगडून दाखवण्यासाठी; विद्यार्थांना धडे

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

काल मध्यरात्री नदीचे पाणी बाहेर फुटू लागल्यानंतर धोका ओळखून येथील नदीकाठच्या पंपिंग स्टेशनवरील पंप सुरू करण्यात आले. आज सकाळी दहा वाजेपर्यंत नदीकाठी तुंबलेले पाणी पंपिंगद्वारे खेचून नदीत सोडण्यात येत होते. प्रचंड पावसाचा कहर लक्षात घेऊन जलस्रोत खात्यासह आपत्कालीन यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com