Mock Drill conducted by NDMA, SDMA, NDRF  Dainik Gomantak
गोवा

Goa Mock Drill : हेलिकॉप्टरची घरघर; अन्‌ जवानांचा थरार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Mock Drill : हेलिकॉप्टरची घरघर अगदी वसाहतीच्या जवळ ऐकू आली आणि आयवा-दोना पावला किनाऱ्यालगत असणाऱ्या घरातील लोक आवाजाच्या दिशेने धावू लागले. नक्की काय चालले आहे, हे कोणास कळत नव्हते.

हेलिकॉप्टर जलक्रीडा प्रकल्पाच्या इमारतीवर एका जागी स्थिरावले. त्यातून जवानाला नेण्यात आले. हा जवळपास दहा मिनिटांचा थरार अनेकांना प्रत्यक्षात काहीतरी अघटित घडल्याचेच दर्शवित होता. परंतु थोड्या वेळाने हा मॉक ड्रिलचा प्रकार असल्याचे लक्षात नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

राज्यात चक्रीवादळ घडल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती सज्ज आहे, याविषयी पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी आपली कार्यक्षमता तपासण्यासाठी सकाळी आयवा किनाऱ्यावरील जलक्रीडा प्रकल्पाच्या इमारतीमध्ये मॉक ड्रिल केले.

संभाव्य चक्रीवादळ आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्याच्या तयारीचा स्तर अधिक कार्यक्षम करण्याचा या कवायतींचा मुख्य उद्देश होता. यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर, डॉग स्कॉडचाही वापर केला.

इमारतीवर अडकलेल्या लोकांना कशाप्रकारे हेलिकॉप्टरमधून नेले जाते, याचे हे प्रात्यक्षिक होते. त्याचबरोबर एखाद्या अडगळीच्या जागेत पडलेल्या व्यक्तीचा शोध श्‍वानाच्या साह्याने घेऊन त्याला उपचारासाठी इमारतीवरून कशाप्रकारे पाठविले जाते, श्‍वानाला इमारतीवरून किंवा हेलिकॉप्टरमधूनही कशाप्रकारे इच्छितस्थळी उतरविले जाते, याचे प्रात्यक्षिक याप्रसंगी करण्यात आले.

Mock Drill conducted by NDMA, SDMA, NDRF

प्रात्यक्षिकात वेळेला महत्त्व

एनडीआरएफच्या दोन पथकांचे पणजी व कोलवा येथे मॉक ड्रिल झाले. त्यात एकूण ५५ जवानांचा सहभाग होता. दरम्यान, विद्यापीठ परिसरात तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये किनाऱ्यावरून उपचारासाठी लोक किती वेळात आणले जातील, याचे प्रात्यक्षिक आणि वेळ नोंदविण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने प्रत्येक कार्य किती वेळात होते, याची नोंद केली जात होती.

अस्नोड्यात एनडीआरएफ

एनडीआरएफचे निरीक्षक अनंत बाबुलकर म्हणाले की, वर्षभर नियमितपणे मॉकड्रिलची कवायत रेल्वे, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केली जाते. गोव्यात बार्देश तालुक्यातील अस्नोडा येथे येथील राज्य सरकारने एनडीआरएफसाठी जागा दिली आहे. त्याठिकाणी एक पथक कार्यरत असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT