Babush Monserrate : बाबूश यांच्‍या हस्‍तक्षेपामुळे पोलिसांसोबत संंबंध ताणलेले

कोर्टात साक्ष : पोलिस स्थानक हल्ला प्रकरण
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak

Babush Monserrate: 2008 साली तत्कालीन काँग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात हे राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात होते. त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा पोलिसांच्या कारभारात सतत हस्तक्षेप सुरू असायचा. त्यामुळे पणजी पोलिसांशी त्यांचे संबंध ताणलेले होते, अशी साक्ष पणजीचे तत्कालीन निरीक्षक आणि सध्याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी दिली.

2008 साली घडलेल्या पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी मडगाव सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर सुरू आहे. हा हल्ला झाला, त्यावेळी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक असलेले नाईक यांची साक्ष सुरू झाली आहे.

Babush Monserrate
Goa Accident: मडगाव- कारवार हमरस्त्यावर गुळे येथे पुन्हा मालवाहू ट्रक पलटला

आजच्या सुनावणीस बाबूश आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. मात्र, माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज आणि उदय मडकईकर हे उपस्थित नव्‍हते.

आपण निरीक्षक असताना वेगवेगळ्या प्रकरणांत आपण मोन्सेरात यांच्या समर्थकांना अटक केली होती, असेही नाईक यांनी सांगितले. नाईक यांची सरतपासणी अर्धवट राहिल्याने आता ती 17 मार्चलापुढे सुरू राहणार आहे.

Babush Monserrate
Goa Suicide News : काणका रोड येथे अज्ञाताची गळफास घेत आत्महत्या

सुनावणी तहकूब

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणाची आजची सुनावणी पुन्हा एकदा साक्षीदार नसल्याने पुढे ढकलली. आता ही सुनावणीही 17 मार्चला होईल. त्याच दिवशी बाबूश यांच्याविरुद्धच्या अल्पवयीन बलात्कार प्रकरणाचीही सुनावणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com