Mobile Tower Agitation  Dainik Gomantak
गोवा

मोबाईल टॉवरचा डाव पाडला हाणून

कंत्राटदाराला हाकलले : चिवार येथील प्रकार; बाऊन्‍सरना पळता भुई थोडी

दैनिक गोमन्तक

शिवोली : हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील चिवार सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात बाऊन्सरच्या मदतीने मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला. तसेच कंपनीच्‍या कंत्राटदारास बाऊन्‍सरना तेथून हाकलून लावले. यापुढे असा प्रयत्न झाल्यास ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्‍यात आला.

हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रात याआधीच चार ते पाच राष्ट्रीय कंपन्यांचे मोबाईल टॉवर आहेत. शिवाय या भागात अद्याप कुठल्याही प्रकारची नेटवर्किंग समस्या निर्माण झालेली नसताना देखील जुन्या सरकारी शाळेच्या आवारात बेकायदा मोबाईल टॉवर उभारण्याची गरजच नसल्‍याचे ग्रामस्‍थ तथा रिव्होल्युशनरी गोवन्सचे सत्यवान हरमलकर यांनी सांगितले.

तथापि, संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराकडून याआधीही दोन वेळा जबरदस्तीने टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला होता. परंतु बुधवारी दुपारी स्थानिकांना अंधारात ठेवून कंत्राटदाराने बाऊन्सर व शाळेच्या शिक्षिकेच्या मदतीने मुख्य गेटचे कुलूप खोलून शाळेच्या आवारात टॉवरच्या कामास सुरुवात केली. ही वार्ता कळताच ग्रामस्थ खवळले व ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी कंत्राटदारावर प्रश्‍‍नांचा भडिमार करून त्‍याला भंडावून सोडले. तसेच निर्वाणीचा इशारा देऊन त्‍याच्‍यासह भाडोत्री बाऊन्सरनाही हाकलून लावले. दरम्‍यान, या प्रकारामुळे ग्रामस्‍थ आता सावध झाले आहेत. तसेच यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT