शिवोली : वागातोरमध्ये आयोजित सनबर्न फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांचे महागडे मोबाईल लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वागातोरच्या पठारावर खाजगी आस्थापनात गेले सतत तीन दिवस सनबर्न फेस्टिव्हल साजरा झाल्याचे समोर आलं आहे. सरकारने परवानगी दिली नसतानाही फेस्टिव्हल कसा झाला असा सवालही आता विचारला जाऊ लागला आहे.
सरकारी परवानगीविनाच आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये (Sunburn Festival) मोबाईल चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत. ख्रिसमस नाईटपासून बुधवारी रात्रीपर्यंत सतत तीन दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये हिलटॉपवर संगीताचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना जेव्हा आपला मोबाईल (Mobile) चोरी झाल्याचं कळालं, तेव्हा लागलीच त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
गुरुवारी दुपारपर्यत हणजुणच्या पोलिसांत (Police) यासंबंधी तक्रारी दाखल करण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आलं. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यापैकी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांनी अन्य चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांत याभागातील पार्ट्यांमध्ये (Party) संगीताचा आनंद लुटतांना स्वत:चे महागडे मोबाईल हरवून बसलेल्या अनेक पर्यटकांनी वैयक्तिक कारणामुळे स्वेच्छेने आपल्या तक्रारी मागे घेतल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, मोबाईल चोरी प्रकरणात हणजुण पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. एकूण आठ संशयित आरोपींना सध्या एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून बुधवारी रात्री मोबाईल चोरीप्रकरणात मन्कादिर बरकत शेख (कुडाळ) तसेच तन्वीर धंद्रा (मालाड-मुंबई) यांच्या विरोधात रितसर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.