
People standing in a queue outside District Hospital for RTPCR Test
Dainik Gomantak
म्हापसा: गोवा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय अर्थातच आझिलो हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणार्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. परिणामी दवाखान्याबहेर चाचणी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. याचा त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होत आहे. कोरोना लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेऊनही चाचणीची सक्ती का केली जात आहे, असा प्रश्न लोक विचारत आहेत.
बुधवार पासून ही चाचणी सेवा सुरू करण्यात आली आहे. ओपीडीसाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. बार्देश तालुक्यापासून जवळच्या तालुक्यातून आलेल्या रुग्णांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही वयस्क रुग्ण सकाळी लवकर तपासणीसाठी येतात. पण ही कोरोना चाचणी सक्तीची केल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे.
जिल्हा हॉस्पिटलमध्ये (District Hospital) येणार्या सर्व रुग्णांनी ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोका लक्षात घेता, नोंदणी करण्यापूर्वी त्यांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करावी, असा निर्देश आरोग्य संचालकांकडून देण्यात आला आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या अधिकार्यांनी दिली. चाचणी अनिवार्य केल्यामुळे हॉस्पिटलच्या कर्मचार्यांतही गोंधळ निर्माण झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.