Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Cuncolim IDC: 'कुंकळ्ळी औद्योगिक' मधील अतिक्रमणांवर कारवाई करा! आमदार आलेमाव यांची मागणी

Yuri Alemao: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत व त्याला लागून असलेल्या सोसियादाद जमिनीवर जागा हडप करण्याच्या हेतूने कारखान्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao About Cuncolim IDC

मडगाव: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत व त्याला लागून असलेल्या सोसियादाद जमिनीवर जागा हडप करण्याच्या हेतूने कारखान्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत आणि त्याला लागून असलेल्या सोसियादाद जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. ज्यामध्ये तात्पुरत्या शेड्स आणि विहिरी बेकायदा कारणासाठी उभारल्या व बांधल्या जातात. सोसियादाद जमिनीवरील होणाऱ्या या अतिक्रमणाचा विषय गंभीर असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बेकायदा कामांसाठी तात्पुरत्या शेड्स आणि विहिरी बांधल्या जात आहेत, हे चिंताजनक आहे. येथील गावकर आणि कुंकळ्ळीकरांसाठी संरक्षित असलेल्या या जमिनीचा औद्योगिक कारखान्यांकडून गैरवापर केला जात आहे, असे आलेमाव यांनी पत्रात म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीजवळील सोसियादाद जमिनीत एका माशांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याने सुमारे ३० मीटर खोल खड्डावजा विहीर खोदली होती. हे पाणी वापरण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर अविराज देसाई व इतर स्थानिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतरच ती जमीन मूळ स्थितीत आणण्यात आली. येथे अतिक्रमणे दिसूनही अधिकारी कारवाई का करत नाही आणि स्थानिकांच्या तक्रारींची वाट का पाहतात. संबंधित विभागांना अशा अतिक्रमणांची पाहणी करून कारवाई करण्याचे अधिकार आहेत; पण ते काहीच करत नाही, असे आलेमाव यांनी पत्रात म्हटले आहे.

कचरा डम्पिंग साईट

आलेमाव यांनी पत्रात म्हटले आहे की, काही कारखान्यांनी धोकादायक कचरा टाकण्यासाठी सोसियादाद जागेचा वापर केला आहे. हे कारखाने सरकारी जमीन व सोसियादादच्या जमिनीवर कचरा टाकत असल्याने, त्याचे रूपांतर कचरा डम्पिंग साईटमध्ये झाले आहे. अतिक्रमणामुळे गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

बांधकामांची पाहणी करावी

औद्योगिक वसाहत व सोसियादाद जमिनीतील सर्व बेकायदा बांधकामांची पाहणी करून कुंकळ्ळीकरांचे हित जपण्यासाठी या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रात म्हटले आहे.

संपूर्ण जमीन जाण्याची भीती

सोसियादाद आणि कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत अजूनही काही बांधकामे, तात्पुरते प्रकल्प आणि शेड्स आहेत, ज्याचा वापर औद्योगिक कारखाने बेकायदेशीरपणे करीत आहेत. त्यांनी बेकायदा कारवाया सुरू ठेवल्यास संपूर्ण जमीन बळकावण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे, असे आलेमाव यांनी पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT