Reis Magos: 'रेईश मागूश' बाबतीत थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार; बांधकामांसाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

Reis Magos Environmental Degradation: मोठ्या प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या रेईश मागूश गावातील पर्यावरण ऱ्हासाविषयी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ॲडविनो फर्नांडिस व राजेश दाभोळकर यांनी ही तक्रार केली आहे.

Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Reis Magos Environmental Degradation Complaint to PM Narendra Modi

पणजी: मोठ्या प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या रेईश मागूश गावातील पर्यावरण ऱ्हासाविषयी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ॲडविनो फर्नांडिस व राजेश दाभोळकर यांनी ही तक्रार केली आहे.

या तक्रारीत त्यांनी या प्रकरणात एका स्थानिक वास्तुविशारदाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. टपालाने पाठवलेल्या या तक्रारीच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना पाठविल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत बांधकाम व्यावसायिकांसाठी काम करताना विभाग बदल, बांधकाम परवानग्या मिळवण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या पत्ररूपी तक्रारीत करण्यात आल्या आहेत.

Reis Magos Environmental Degradation: मोठ्या प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या रेईश मागूश गावातील पर्यावरण ऱ्हासाविषयी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ॲडविनो फर्नांडिस व राजेश दाभोळकर यांनी ही तक्रार केली आहे.
Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष

या प्रकल्पामुळे गावातील पर्यावरणाचे नुकसान झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. राजकारण्यांशी असलेले संबंध, त्‍या आधारे प्रभावातून कायद्यात बदल करण्यात आले असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्‍या वास्तुविशारदाचे विविध मंत्र्यांशी घनिष्ठ संबंध असून त्यांनी कायद्यातील बदलांवर प्रभाव टाकला असल्याचा आरोपही केला आहे. एका उद्योग समूहावर प्राप्तिकर खात्याने छापे टाकले, त्यावेळी याही वास्तुविशारदावर छापे पडले होते याकडेही पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com