MLA Viresh Borka Strike March Goa Water Problem Dainik Gomantak
गोवा

Goa Water Problem : सांतआंद्रेतील पाणीप्रश्‍न 8 दिवसांत सोडवा

अन्यथा आंदोलन : वीरेश बोरकर यांची रहिवाशांसह ‘साबांखा’वर धडक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Water Problem : नुकताच कोठे मार्च महिना सुरू झाला असताना राज्‍यात अनेक ठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या उग्र बनली आहे.

सांतआंद्रे मतदारसंघातील लोकांनी तर आमदार वीरेश बोरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली खात्याच्या आल्तिनो-पणजी येथील मुख्यालयावर धडक मोर्चा नेला. तसेच आठ दिवसांत समस्या सोडविली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

दरम्‍यान, उसगाव-गांजेवासीयांना सध्या दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पंधरा दिवसांत समस्‍या सुटली नाही तर खात्‍यावर घागरमोर्चा काढण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे.

पाण्याची समस्या दिवसंदिवस गंभीर होत चालली असून कुडका परिसरात ही समस्या अगोदर होती. आता नेवरा, डोंगरी आणि आजोशी परिसरात देखील पाणी पुरवठा अनियमितपणे होत आहे.

अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कार्यवाही होत नाही. ही समस्या न सुटल्यास लोकांची भांडी आणि धुण्याचे कपडे घेऊन बांधकाम खात्याच्या मुख्यालयासमोर आणून आंदोलन करू, असे बोरकर यांनी सांगितले.

सांतआंद्रेतील पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी काम आजच हाती घेतले असून येणाऱ्या आठ दिवसांत समस्येचे निवारण केले जाईल. पाणी पुरवठा नियमितपणे होत नसल्याचे खात्याच्या लक्षात आले नव्हते. त्यामुळे आता त्वरित काम केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी बोरकर यांना आश्‍वासन दिले.

सत्तरीत पाणीटंचाई जाणूनबुजून निर्माण केली जात आहे. त्‍यास टँकरमाफिया जबाबदार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी आणि टँकर माफिया यांच्‍यात साटेलोटे असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

- विश्‍वजीत राणे, नगरनियोजनमंत्री

सांतआंद्रे मतदारसंघात 2 ते 3 तास पाणी पुरवठा होत आहे, त्यात केवळ आगशीत अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. अनेकदा खंडित विजेमुळे थेट पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळेही समस्या उद्‍भवते. आमदार वीरेश बोरकर यांनी मला आज फोन केला होता, परंतु बैठकीत असल्याने फोन घेता आला नाही.

- नीलेश काब्राल, मंत्री, सार्वजनिक बांधकाम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT