Generic Medicine in Goa: राज्यातील प्रत्येक औषधालयात (फार्मसी) जेनरिक औषधांचे काऊंटर सुरू करण्यात येतील. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन संचालकांना त्याबाबतची अधिसूचना काढण्यास सांगणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
पाचव्या जेनेरिक औषधदिनानिमित्त येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या कार्यक्रमानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, सामान्य माणसाला कमी दरात औषधे मिळावीत, हा उद्देश या औषध उपलब्धतेचा आहे.
त्यामुळे प्रत्येक डॉक्टर जे औषधांची यादी देतात, तेव्हा जेनेरिक औषधांचीही यादी द्यावी लागणार आहे. त्यामुळे कोणती औषधे घ्यावयाची ते संबंधिताच्या निवडीवर अवलंबून राहील. पुढील 30 दिवसांत ही सुविधा कशा पद्धतीने अमलात येईल हे पाहिले जाईल.
सामान्य लोकांना कमी दरात औषधे मिळवून देण्याचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे, ते या सुविधेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. लोकांचे जीवन वाचविण्यासाठी ज्या काही सुविधा आवश्यक आहेत, त्या उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही राणे यांनी नमूद केले.
जेनेरिक औषधे ही सर्वसामान्यांना परवडणारी असून, ती ॲलोपथिक औषधांएवढीच प्रभावी आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
सांगे किंवा नेत्रावळीत ‘टायगर पार्क’
वाघाचे दर्शन घ्यायचे असेल तर आपल्याला बोंडला अभयारण्याला जावे लागत होते. पण अनेक वर्षांपासून तेथेही वाघ नाही. राज्य सरकार आता सांगे किंवा नेत्रावळीत ‘टायगर पार्क’ उभारण्याच्या तयारीत आहे.
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी तसे संकेत दिले आहेत. बोंडलामध्ये ‘टायगर पार्क’ होणार असल्याचे वृत्त येऊ लागल्याने त्याबाबत विचरणा केली असता राणे यांनी ती शक्यता फेटाळली. सांगे किंवा नेत्रावळीत टायगर पार्क उभारला जाईल, असे ते म्हणाले. यावरून आता बोंडला अभयारण्यात वाघ नसतील, हे स्पष्ट झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.