Goa Forward Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: गोवा फॉरवर्डने ‘ते’ वृत्त फेटाळले

Goa Forward: चर्चा मात्र सुरूच : सरदेसाई एनडीएला पाठिंबा देण्‍याच्‍या तयारीत!

दैनिक गोमन्तक

Goa Forward: मडगाव येत्‍या 6 फेब्रुवारी रोजी मडगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पण या सभेच्‍या निमित्ताने सध्‍या मडगावात एक वेगळीच चर्चा सुरू आहे. गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे एक तर त्‍या दिवशी भाजपमध्‍ये प्रवेश करतील किंवा आपल्‍या पक्षाचा पाठिंबा एनडीएला जाहीर करतील, अशी ही चर्चा आहे. दरम्‍यान, गोवा फॉरवर्डने या वृत्ताचा पूर्णत: इन्‍कार केला आहे.

राष्‍ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडीचे घटक असलेल्‍या तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन पक्षांनी प. बंगाल आणि पंजाब या राज्‍यांत काँग्रेसबरोबर युती करण्‍यास नकार दिला असताना गोव्‍यात मागच्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती केलेली गोवा फॉरवर्ड पार्टी वेगळी भूमिका घेणार का? असा प्रश्‍‍न सध्‍या चर्चिला जात आहे.

मात्र गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना सांगितले की, ही केवळ व्‍हॉटस्‌ॲप आर्मीने पसरविलेली अफवा आहे. सध्‍या विजय

सरदेसाई यांनी येत्‍या विधानसभा अधिवेशनावर आपले लक्ष केंद्रीत केलेले आहे. या अधिवेशनात गोमंतकीयांना सतावणारे जास्‍तीत जास्‍त प्रश्‍‍न उपस्‍थित करून त्‍या समस्‍या मार्गी कशा लागतील याकडे त्‍यांनी लक्ष दिलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्‍या ठिकाणी होणार आहे, त्‍या जागेची आमदार विजय सरदेसाई यांनी चार दिवसांपूर्वी स्‍वत: पाहणी केली आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्‍या विनंतीवरून आपण ही पाहणी केली असल्‍याचे नंतर सरदेसाई यांनी प्रसारमाध्‍यमांना सांगितले होते. त्‍यानंतरच ते भाजपमध्‍ये प्रवेश करणार या चर्चेने जोर धरला आहे.

कोण म्‍हणतोय, मी भाजपमध्‍ये जातोय?

सध्‍या जी चर्चा सुरू आहे त्बाबाबत आमदार विजय सरदेसाई यांना विचारले असता आपल्‍या नेहमीच्‍या स्‍टाईलमध्‍ये त्‍यांनी प्रतिप्रश्‍‍न केला. कोण म्‍हणतोय, मी भाजपमध्‍ये जातोय? भाजपच्‍या कुणी अधिकाऱ्याने तशी अधिकृतपणे घोषणा केली आहे का? काही विघ्‍नसंतोषी लोक या अफवा पसरवत आहेत. त्‍यात काँग्रेस पक्षातील काहीं जणांचा समावेश आहे, असा आरोपही सरदेसाई यांनी केला.

विजय सरदेसाई हे इंडिया आघाडीत की एनडीएबरोबर? : काँग्रेस

एकेकाळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेले गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई बारा वर्षांपूर्वीच्या काँग्रेस सरकारकडे बोट का दाखवतात? तसेच 2017 मध्ये त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या अनेक घोटाळ्यांबद्दल का बोलत नाहीत? असे सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्यकुमार यांनी उपस्‍थित केले आहेत.

विजय सरदेसाई सध्‍या आपल्या राजकीय भवितव्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे ते इंडिया ब्लॉक बद्दल बोलतात आणि दुसरीकडे ते सरकारी पैशांतून पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या प्रचारसभेसाठी योग्य जागा शोधण्यासाठी हाफ पँट घालून मिनी-बसमध्ये फिरतात, असा टोलाही दिव्यकुमार यांनी हाणला. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT