Goa Crime  Danik Gomantak
गोवा

Goa Assembly: कोलवा मारहाणीचे विधानसभेत पडसाद; सरदेसाईंची कारवाईची मागणी

Colva Police: गुन्‍हा वदवून घेण्‍यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर केला होता त्‍याचे वृत्त ‘गोमन्‍तक’ने प्रसिद्ध केले होते

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: खुनाचा प्रयत्‍न केल्याच्या आरोपाखाली काेलवा पोलिसांनी अटक केलेल्‍या टायसन उर्फ नासीर मसूद याच्‍याकडून गुन्‍हा वदवून घेण्‍यासाठी जो ‘थर्ड डिग्री’चा वापर केला होता, त्‍याचे वृत्त ‘गोमन्‍तक’ने प्रसिद्ध केल्‍यानंतर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत त्‍यावर आवाज उठवून कोलवा पोलिस स्‍थानकाच्‍या निरीक्षकावर कारवाईची मागणी केली.

या संशयिताने यापूर्वी मडगाव न्‍यायालयात त्‍याला रिमांडसाठी आणले असता, पाेलिसांनी आपल्‍याला मारहाण करण्‍यासह पायाच्‍या अंगठ्याचे नख उखडून काढले, असे न्‍यायालयात सांगितले होेते.

‘गोमन्‍तक’ने ६ ऑगस्‍टच्‍या अंकात ‘गुन्‍ह्याची कबुली घेण्‍यासाठी पोलिसांनी डोके भादरले!’ या मथळ्याची बातमी पहिल्‍या पानावर प्रसिद्ध केली हाेती. यावर विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत आवाज उठवला. यासंदर्भात आपल्‍याकडे तक्रार आलेली आहे. तो आरोपी असला तरी त्‍याचा छळ पाहता आम्‍ही गोव्‍यात आहोत की, दुसरीकडे असे वाटण्‍याजोगी स्‍थिती आहे. संबंधितावर कारवाईची गरज असून मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यात लक्ष घालावे, असे त्‍यांनी सांगितले.

विधानसभेत ‘गोमन्‍तक’च्‍या बातमीची दखल घेण्‍याची ही दुसरी वेळ असून यापूर्वी मायणा-कुडतरी पोलिसांना तुरी देऊन दोघांनी पळ काढला हाेता. बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी शून्‍य प्रहारात हा मुद्दा उचलून गोव्‍यातील पाेलिस ‘झोकलेल्‍या’ स्थितीत असतात का, असा प्रश्‍न केला हाेता.

टायसनविरोधात कोलवा पोलिसांत आणखी दोन गुन्‍हे

काेलवा पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, अशी तक्रार टायसनने केल्‍यानंतर मडगाव न्यायालयाने त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली हाेती. त्‍यानंतर आता कोलवा पोलिसांनी टायसनसह अक्षय तलवार या दोघांवर आणखी दोन गुन्‍हे नोंद केले आहेत. यातील एक गुन्‍हा २६ एप्रिल रोजी तर दुसरा गुन्‍हा ६ जून रोजी घडल्‍याचे तक्रारीत नमूद केले आहे.पहिली तक्रार हरेश राठाेड, तर दुसरी सुदन शिरोडकर याने दिली हाेती. टायसनच्‍या दहशतीमुळे तक्रारदार तक्रार देण्‍यास पुढे येत नव्‍हते. आता त्‍याला अटक केल्‍यामुळे तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत, असे कोलवा पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT