MLA Vijay Sardesai Oppose Rent A Bike Service At Margao Station By Konkan Railway Local Tourism Dainik Gomantak
गोवा

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

Konkan Railway News: रेल्वे पर्यटन व्यवसायत येऊन स्थानिकांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

Pramod Yadav

कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर रेंट अ बाईकच्या प्रस्तावित सुविधेला फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी कडाडून विरोध केला. कोकण रेल्वेची ही सेवा काही झाले तरी आम्ही मडगावात सुरु होऊ देणार नाही, असे सरदेसाई म्हणाले. तसेच, यासाठी त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे.

कोकण रेल्वेने करमळी स्थानक परिसरात लेक व्ह्यू रेस्टॉरंट उभारणार असल्याचे तसेच, मडगाव स्थानकासह इतर महत्वाच्या स्थानकांवर रेंट अ बाईकची सुविधा सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी माहिती दिली आहे.

याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत रेल्वेचे काम ट्रेन वेळेवर सोडण्याचे असून त्यांनी व्यवसायात पडू नये. शिवाय त्यांनी आमदार दिगंबर कामत यांच्यावर देखील टीका केली.

रेंट बाईक, रेंट कार, हॉटेल हा गोंयकारांचा व्यवसाय. पण, रेल्वे पर्यटन व्यवसायत येऊन स्थानिकांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

सरदेसाई यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर टीका करताना, कोकण रेल्वेचा हा प्लॅन त्यांना माहिती होता का? असा सवाल उपस्थित केला. तसेच, कामत दक्षिण मडगावसाठी एक मास्टर प्लॅन तयार करत आहेत, त्याचाच हा एक भाग आहे का? याबाबतही त्यांनी स्पष्टिकरण द्यावे असे सरदेसाई म्हणाले.

तसेच, कोकण रेल्वेच्या प्रस्तावित सुविधेबाबत कामत यांना माहिती नाही असे म्हटल्यास ते त्यांच्या या प्लॅनला विरोध करतील का? याबाबत त्यांनी माहिती द्यावी, असे सरदेसाई म्हणाले.

पर्यटनमंत्री खंवटे यांना तरी याबाबत काही माहिती आहे का? असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला.

मडगावकरांना एकत्र येण्याचे आवाहन

कोकण रेल्वेच्या या प्लॅनविरोधात मडगावकरांनी एकत्र येण्याचे आवाहन विजय सरदेसाई यांनी केले. मडगावमधील टॅक्सी चालक, रेंट बाईक चालक यांच्या मुलांचे भवितव्य धोक्यात असल्याचे सरदेसाई म्हणाले. सरदेसाई यांनी कोकण रेल्वेच्या या प्रस्तावित प्लॅनचा निषेध करत आमदार दिगंबर कामत यांच्यावर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT