गोव्यात पुढील काही तासांत राजधानी पणजीसह सात तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. गोवा हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेनुसार पुढील तीन ते चार तास हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात पुढील तीन ते चार तास पणजीसह सत्तरी, तिसवाडी, डिचोली, बार्देश, सांगे, काणकोण आणि केपे या तालुक्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
चार वाजल्यापासून वरील तालुक्यांच्या भागात पावसाचे ढग जमा झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाचे ढग दक्षिण - पश्चिम दिशेने प्रवास करत असल्याने राज्यातील इतर तालुक्यांना देखील पावासाचा फटका बसण्याची शक्याता वर्तविण्यात आला आहे.
वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने खुल्या मैदानात काम करण्याचे टाळा.
उंच झाडे किंवा धोकादायक इमारतीच्या खाली आडोशाला आसरा घेऊ नका.
वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेता वीज खांब किंवा इतर धोकादायक ठिकाणी थांबण्याचे टाळा.
ईलेक्ट्रिक डिव्हाईस वारण्याचे टाळा तसेच हवामान खात्याच्या माहिती आणि सूचनांकडे लक्ष द्या
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.